घरमुंबईमुंबईकरांना 'बेस्ट'कडून रक्षाबंधन गिफ्ट

मुंबईकरांना ‘बेस्ट’कडून रक्षाबंधन गिफ्ट

Subscribe

रक्षाबंधन दिवशी प्रवाशांची जास्त गर्दी आढळल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. रक्षाबंधनला दिवसभर बेस्टकडून ही सेवा मुंबईकरांना उपलब्ध असणार आहे.

रक्षाबंधननिमित्त राज्य परिवहन महामंडळाने खूशखबर दिल्यानंतर आता बेस्टकडून देखील मुंबईकरांना खूशखबर देण्यात आली आहे. रक्षाबंधन सणाला प्रवाशांचा प्रवास सुखकारक आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी बेस्टकडून ज्यादा गाड्या सोडण्यात येण्यार आहेत. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधन सणादिवशीचा मुंबईकरांचा प्रवास चांगला होणारा आहे.

१९७ ज्यादा बसेस सोडणार

२५ ऑगस्टला रक्षाबंधन सण आहे. रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी अनेक बहिणी भावाच्या घरी तर भाऊ बहिणीच्या घरी जात असतात. या दिवशी प्रवाशी वाहतूकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून बेस्टने देखील जाद्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टकडून १९७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गर्दीपासून हाल होणार नाही.

- Advertisement -

रक्षाबंधनला दिवसभर सेवा उपलब्ध

मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसआगारातून शहर आणि उपनगरातील विविध ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या बसगाड्यांचे प्रवर्तन सकाळी १०.३० वाजल्यापासून दिवसभर चालू राहील. प्रवाशांची जास्त गर्दी आढळल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याचीही व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी बसथांब्यावर तसेच बसस्थानकावर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -