घरताज्या घडामोडीमुंबईत लोकलमध्ये अडकले प्रवासी, NDRFचे बचाव कार्य सुरू

मुंबईत लोकलमध्ये अडकले प्रवासी, NDRFचे बचाव कार्य सुरू

Subscribe

मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आजही मुंबईला पावसाने झोपडले आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मशीद बंदर आणि भायखळा स्टेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे या स्टेशनदरम्यान दोन लोकल गाड्या अडकल्या आहे. यातील १५० प्रवाशांची सुटका करण्यात आली असून अद्यापही १०० ते १२० प्रवासी लोकलमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे मदतीसाठी एनडीआरएफ(NDRF)ची टीम पाचारण करण्यात आली असून सध्या बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisement -

सीएसटीवरून कर्जतला जाणारी पहिली लोकल अडकली असून यामधील १५० प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी लोकलमधून सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच दुसरी लोकल कर्जत वरून सीएसटीकडे येणारी मशीद बंदर स्टेशनवजवळ अडकली आहे. या लोकलमधील ५० ते ६० प्रवासी आहेत. इथे पाण्याची पातळी २ ते ३ फुटापर्यंत आहे. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम अंधेरीवरून पाचारण करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नागरिकांनो घरातच थांबा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -