ताडदेवमध्ये भिंत कोसळून २ ठार

ताडदेव येथे घराची भिंत कोसळून दोन जण ठार झाले आहेत. दुपारी ११ वाजता ही दुर्घटना घडली आहे.

Mumbai
sangali : tempo came from wrong side killed a man
प्रातिनिधिक फोटो

ताडदेव येथे घराची भिंत कोसळून दोन जण ठार झाले आहेत. दुपारी ११ वाजता ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये एक कनिष्ठ अभियंता देखील होता. ताडदेव येथील श्री सिद्धी अव्हेन्यू टॉवरजवळ बांधकाम सुरू होतं. त्या ठिकाणी भिंत कोसळली. त्यामध्ये दोन जण ठार आणि १ जण जखमी झाले. त्यानंतर तिघांनाही नायर रूग्णालयामध्ये आणण्यात आले. फैज खान वय वर्षे २४, तपनदास वय वर्षे २८ अशी मृत पावलेल्या लोकांची नाव आहेत. तर, जयदेव रॉय वय वर्षे २२ याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. श्री सिद्धी अव्हेन्यू टॉवरजवळ बेसमेंट पीलर्स टाकण्याचे काम सुरू होते. तेव्हा त्या ठिकाणी जमीन खचून हा अपघात झाला. यामध्ये दोन जण ठार झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here