घरमुंबई२० वर्षाच्या तरूणाची लोकलसमोर आत्महत्या, व्हिडीओ आला समोर

२० वर्षाच्या तरूणाची लोकलसमोर आत्महत्या, व्हिडीओ आला समोर

Subscribe

२० वर्षाच्या तरूणानं लोकलसमोर उडी मारत आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी त्यानं मोबाईल फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. २० वर्षाच्या तरूणानं लोकलसमोर उडी मारत आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी त्यानं मोबाईल फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला आहे. रोहित परदेशी असं या तरूणाचं नाव असून त्यानं आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये रोहित परदेशीनं माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. गुरूवारी रोहितचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडलेला आढळला. पण, रोहित परदेशीनं आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्याप देखील कळू शकलेलं नाही. इन्स्पेक्टर दिनकर पिंगळे यांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती दिली आहे. मोबाईल तपासल्यानंतर त्यामध्ये रोहितनं रेकॉर्ड केलेला मेसेज मिळाला. दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्यानं आपली सर्व संपत्ती आपल्या लहान भावाला देण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -