घरमुंबईप्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी २०० निरीक्षक

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी २०० निरीक्षक

Subscribe

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यावर त्याची प्रभावी अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. त्यासाठी शहरात २०० निरीक्षक तैनात केले जाणार आहेत.

मुंबई महापलिकेने प्लास्टिक बंदी करण्यासाठी आपल्या मंड्यांमध्ये २५ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केले आहे. महापालिकेच्या साठ्यातील आधीपासूनच असलेल्या कचरा संकलन पेट्यांचा वापर करुन ही प्लास्टिक संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. प्रतिबंधित प्लास्टिकच्या संकलनासाठी उपयोगात येणा-या या संकलन केंद्रांना प्रामुख्याने काळा रंग देण्यात आला असून चाके असल्याने ही संकलन केंद्रे हलविणे सुलभ असणार आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या २५ सार्वजनिक ठिकाणी ही संकलन केंद्रे सुरु करण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी २३ जूनपासून केली जाणार आहे. त्यासाठी शहरात २०० निरीक्षक तैयाणात केले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकाराला जाणार आहे.

हे इन्स्पेक्टर्स बाजारांमध्ये प्लास्टिक पिशवी विकल्या किंवा दिल्या जातात का याचीही पाहणी करणार आहेत. दुकानदारांकडे किंवा ग्राहकांकडे प्लॅस्टिकची पिशवी आढळली तर त्यांना दंड करण्यात येणार आहे. महापालिकेने या निरीक्षकांना निळ्या रंगाच्या जॅकेट दिले जाणार आहेत.

- Advertisement -

काय होणार कारवाई –
– पहिल्यांदा प्लास्टिक पिशवी आढळल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जाईल
– पुन्हा त्याच व्यक्तीकडे प्लास्टीक पिशवी आढळली तर १० हजार दंड आकारणार
– तिसऱ्या वेळी त्याच व्यक्तीकडे प्लास्टिकची पिशवी आढळली तर त्या व्यक्तीला २५ हजार रुपये दंड
– ३ महिन्यांची शिक्षा देखील होऊ शकते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -