घरमुंबईकल्याण : निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरूवात

कल्याण : निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरूवात

Subscribe

२०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच निवडणुकीचे कल्याणमध्ये बिगुल वाजायला सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. कल्याणमध्ये विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांकडून महोत्सव आणि मेळावा निमित्ताने दोन्ही शहरात हजेरी लावली जात आहे.

२०१९मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच निवडणुकीचे कल्याणमध्ये बिगुल वाजायला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय घडामोडींसाठी कल्याण आणि डोंबिवली शहर महत्वाचे केंद्र आहेत. कल्याणमध्ये नुकतीच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महोत्सव आणि मेळावाच्या निमित्ताने दोन्ही शहरात हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आदी राजकीय मंडळींनी दोन मोठ्या महोत्सवाला भेट दिली.

हेही वाचा – कल्याणमध्ये यंदा प्रथमच आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली दौरा चर्चेचा विषय

डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात आयोजित केलेला श्रीनिवास मलंग महोत्सव सर्वाधिक चर्चेचा ठरला. शहरभर केलेली बॅनरबाजी, आकर्षक प्रकाशयोजना,भव्यदिव्य नियोजनाच्या माध्यमातून मोठी गर्दी जमवत सेनेने याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या महोत्सवाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण येथील ‘आगरी कोळी महोत्सव’ आणि ‘CM चषक’ यादोन्ही ठिकाणी हजेरी लावत व्यासपीठावर जोरदार भाषण केले आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे फडणवीस यांचा कल्याण दौरा आणि ठाकरे परिवाराचा डोंबिवली दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला बनला.

विविध पक्षांकडून कार्यक्रमाचे आयोजन

आगरी-कोळी महोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावत सर्व एकत्र राहा असा सल्लाही दिला. येत्या १५ डिसेंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात आपली पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे मेळावा ठेवण्यात आला होता. यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा हजेरी लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे एक प्रकारे २०१९ च्या निवडणूकीचे बिगुल वाजयाला सुरूवात झाली आहे, अशी चर्चा दोन्ही शहरात चालू झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गणेश नाईकांना लोकसभेसाठी उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -