मुंबईत लव्ह जिहाद कनेक्शन गोवंडीतून ?

जानेवारीपासून २१ मुली गायब झाल्याच्या तक्रारी

govandi

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अशा सर्वात मागास भागातील गोवंडी परिसरातून २१ तरूण मुली जानेवारी महिन्यापासून गायब झाल्या आहेत. सरासरी १५ वर्षे २५ वर्षे या वयोगटातील या मुली आहेत. गोवंडी परिसरातून गायब होणाऱ्या मुलींचे कनेक्शन हे लव्ह जिहादशी आहे अशी शंका भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. तसेच ठाकरे सरकार या सर्व प्रकरणाची चौकशी करणार का ? अशीही विचारणा किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.

गोवंडी परिसरातून १५ ते २५ वयोगटातील मुली अचानक कशा गायब झाल्या ? त्यांना कोणी पळवले किंवा कोणत्या कारणामुळे या मुली गायब झाल्या ? त्यांना कोणी फसवल ? असाही सवाल त्यांनी केला आहे. म्हणूनच या संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी खुद्द किरीट सोमय्या या भागात जाऊन स्थानिकांशी बोलणार आहेत. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरूनच मिसिंग लिस्टमधील नावे त्यांनी मांडली आहेत. त्यामुळेच गेल्या ११ महिन्यात गायब झालेल्या मुलींचे लव्ह जिहादशी काही कनेक्शन आहे का ? याचीही ठाकरे सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या १२ दिवसातच आणखी ४ मुली गायब झाल्याने पुन्हा एकदा लव्ह जिहाद भोवतीचा संशय पुन्हा दाट होऊ लागला आहे.

शिवसेनाचा बदलता रंग म्हणत शिवसेनेच्या सोयीस्कर सोयीस्कर भूमिकेवरही किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. याआधीच्या 10 सप्टेंबर 2014 चा अंकात “सामना” वर्तमानपत्र संपादक उध्दव ठाकरे लिहितात “लव्ह जिहाद” समाज साठी घातक अशी आठवण त्यांनी करून दिली आहे. योगी आदित्य नाथना पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण 21 नोव्हेंबर 2020 शिवसेनेच्याच महापौर सांगतात “लव्ह जिहाद” मधे गैर काहीच नाही या शिवसेनेच्या भूमिकेवर किरीट सोमय्या यांनी विचारणा केली आहे.