घरमुंबईभरकटलेल्या २१ पर्यटकांची सुटका

भरकटलेल्या २१ पर्यटकांची सुटका

Subscribe

तांदुळवाडी किल्ल्यात रात्रीच्यावेळी भरकटलेल्या जवळपास २१ पर्यटकांची ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली. सफाळे येथील तांदुळवाडी किल्ल्यात पर्यटनासाठी मुंबईतील काही तरुण-तरुणी रविवारी गेले होते. या किल्ल्यातील जंगल परिसरात भरकटत गेले. त्यांना परतीच्या वाटा सापडल्या नाहीत, त्यातच अंधारही पडल्यामुळे हे पर्यटक घाबरले होते. पायवाटा चुकल्यामुळे ते डोंगरावरच अडकून पडले. यापैकी एका पर्यटकाने ठाणे पोलीस कंट्रोल रूमला फोन करून जंगलात अडकल्याची माहिती दिली. कंट्रोल रूममधील पोलिसांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लागलीच पालघर कंट्रोल रूम आणि तिथून सफाळे पोलिसांनी ही माहिती देण्यात आली.

तांदुळवाडी जंगलात असलेल्या जंगली श्वापदांचा पर्यटकांना धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप यांंनी हवालदार एस.यु.सोळखे, एस.बी.भंवर, एन.एल.धोंगडे यांना पर्यटकांच्या मदतीला पाठवले. या तिघांनी तांदुळवाडी ग्रामस्थांची मदत घेऊन रात्री 9 वाजता अवघ्या तासाभरातच या पर्यटकांना शोधून काढले. हिमांशु जैन, जैनम लोधा, शुभम शर्मा, साक्षी शहा, ग्रीशा ओसा, उर्मी वाकरिया, दिव्या गौरे, शशिकांत आवर्क, जयराणी लठ्ठ हरिष ठाकूर यांच्यासह अन्य 11 तरुण-तरुणींचा समावेश होता. त्यांची या जंगलातून सुखरूप सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीतून सफाळे रेल्वे स्थानकात नेऊन सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -