घरमुंबईवाचा - मुंबईत किती कर्मचारी, अधिकाऱ्यांची फौज लागलीए निवडणुकीच्या कामाला

वाचा – मुंबईत किती कर्मचारी, अधिकाऱ्यांची फौज लागलीए निवडणुकीच्या कामाला

Subscribe

मुंबई शहर जिल्ह्यात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे १० विधानसभा मतदारसंघ आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत असलेल्या १० विधानसभा मतदार संघासाठी २१ हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुका पारदर्शी, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी नियुक्ती विभागाचे समन्वयक संपत डावखर यांनी दिली. मुंबई शहर जिल्ह्यात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे १० विधानसभा मतदारसंघ आहेत.

कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय नेमणूक

मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकारी ते निवडणूक विषयक यंत्रणा हाताळणारे सर्व विभागाचे वेगवेगळे अधिकारी व कर्मचारी असे सर्व मिळून जवळपास २१ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, शिपाई तसेच या सर्वांना सहकार्य करण्यासाठी १२०० कार्यालयीन कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय नेमणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही, आजारी कर्मचाऱ्यांना वगळले

निवडणुकीचे काम हे अतिशय महत्वाचे असून या कामात गैरहजर राहणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. प्रथम प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या जवळपास २३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही केली आहे. तसेच जे कर्मचारी, अधिकारी आजारी आहेत व त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केले आहे त्या सर्व आजारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळले आहे. या खेरीज कर्मचाऱ्यांची वास्तववादी कारणे अथवा निकडीची गरज लक्षात घेता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात आली आहे, असे डावखर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -