Corona In Mumbai: मुंबईत आढळले २,२२७ नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू!

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार २२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

2227 new corona patient found and 43 deaths in mumbai today
मुंबईची आकडेवारी

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार २२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६० हजार ७४४ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत ८३९ रुग्ण बरे झाले असून एकूण १ लाख २६ हजार ७४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज झालेल्या मृतांपैकी ३७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच २८ रुग्ण पुरुष आणि १५ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ जणांचे वय ४० होते. तर ३१ जणांचे वय ६० वर्षावर होते.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत एकूण २५ हजार ६५९ रुग्ण उपचार घेत असून दुप्पटीचा दर हा ६३ दिवस असून २ सप्टेंबर-८ सप्टेंबर दरम्यान कोविड वाढीचा दर १.१० टक्के इतका आहे.


हेही वाचा – Corona: दोन दिवसानंतर पोलीस बाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ