घरCORONA UPDATEMumbai Corona: गेल्या २४ तासात २,२८७ नव्या रूग्णांचे निदान; ४७ जणांचा बळी

Mumbai Corona: गेल्या २४ तासात २,२८७ नव्या रूग्णांचे निदान; ४७ जणांचा बळी

Subscribe

दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३४७ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत

मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २५ हजार ०४८ वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ३४० वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३४७ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८९ हजार ०२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २ हजार ३४७ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आज २ हजार २८७ नवे रुग्ण सापडले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. ३१ जण हे ६० वर्षांवरील, तर १४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८४% आहे.

- Advertisement -

राज्यातील बाधितांची संख्या १५ लाख ६ हजारांवर

गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार १३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ०६ हजार ०१८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ७३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण १२,२९,३३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१. ६३ % एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -