हिमालय पूल कोसळल्यावरमध्य रेल्वेला आली जाग

 २३ पुलांचे सुरक्षा ऑडिट करणार

Mumbai
Railway

सीएसएमटीजवळील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पूल कोणाचा आणि जबाबदारी कुणाची यावरुन मध्य रेल्वे आणि पालिका प्रशासनात एकामेकावर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. परंतु हिमालय पूल पालिकेचाच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सावध झालेल्या मध्य रेल्वेला जाग आली आहे. त्यांनी आपल्या हद्दीतील पुलांची माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये २३ पुलांचे सुरक्षा ऑडिट झाले नसून लवकरच आयआयटी,पालिका आणि रेल्वे प्रशासन ते पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे.

गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पुलाचा बराचसा भाग कोसळल्यामुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागता.त्यानंतर सुरू झालेल्या वादामध्ये पालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात केली. शेवटी पालिकेने पूल आपलाच असल्याचे मान्य केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील पुलांची माहिती प्रसिद्ध केली. मध्य रेल्वेच्या हद्दीमध्ये रोड ओव्हर ब्रीज ८९, पादचारी पूल १९१ आहेत. त्यापैकी ८१ रोड ओव्हर ब्रीज तर १७८ पादचारी पुलांचे सुरक्षा ऑडिट झाले आहे. तर इतर १९ पुलांपैकी १७ पुलांची तपासणी पूर्ण झालेली आहे. उरलेल्या २३ पुलांचे ऑडिट लवकरच पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

पुलांची माहिती -एकूण -ऑडिट झालेले
रोड ओव्हर पूल – ८९  – ८१
पादचारी पूल – १९१  – १७८
इतर स्ट्रक्चर –  १९   – १७
एकूण – २९९  – २७६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here