घरमुंबईमुंबईसाठी २४ फिरती शौचालये; येत्या चार महिन्यात वापरासाठी होणार उपलब्ध

मुंबईसाठी २४ फिरती शौचालये; येत्या चार महिन्यात वापरासाठी होणार उपलब्ध

Subscribe

मुंबईत एकूण २४ फिरती शौचालये खरेदी केली जात आहे. या प्रत्येक शौचालयांमध्ये १० शौचकुपांची व्यवस्था आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत सार्वजनिक शौचालयांची बांधकामे करण्यासाठी अनेक ठिकाणी शौचालये तोडली जात असल्याने लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी फिरती शौचालये (मोबाईल टॉयलेट) खरेदी केली जात आहे. मुंबईत एकूण २४ फिरती शौचालये खरेदी केली जात आहे. या प्रत्येक शौचालयांमध्ये १० शौचकुपांची व्यवस्था आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सध्या ९० फिरती शौचालये आहे. या फिरत्या शौचालयांचा वापर विविध सण, उत्सव, जत्रा, प्रदर्शनाच्या ठिकाणी, सार्वजनिक सभा, संमेलन तसेच इमारत व चाळींची दुरुस्ती, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व पुनर्बांधकाम, इमारत दुघर्टना, भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तीच्यावेळी याशिवाय नोकरभरती, निवडणूक आदी शासकीय कार्यक्रमांच्या ठिकाणीही या फिरत्या शौचालयांचा वापर केला जातो.

४ महिन्यांमध्ये शौचालये उपलब्ध – उपायुक्त

त्यामुळे या ९० फिरत्या शौचालयांव्यतिरिक्त १० आसनांच्या प्रत्येकी २४ शौचालयांची खरेदी केली जात आहे. सध्या ही शौचालये जुनी झाली असल्याने त्या जागी नवीन फिरती शौचालये घेणे आवश्यक आहे. त्यानुसार निविदा प्रक्रीया राबवून कंत्राटदाराची निवड केली आहे. या कंत्राट कामाला स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार कार्यादेश जारी केल्यानंतर ४ महिन्यांमध्ये ही शौचालये उपलब्ध होतील, असे उपायुक्त अशोक खैरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेची मोहिम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने मुंबई शहर हगणदारीमुक्त ठेवण्यासाठी विविध ठिकाणी फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. तसेच ज्या घरांमध्ये स्वच्छतागृहे नाही, अशा नागरी वस्त्यांमध्ये स्वच्छतागृहे बांधून पूर्ण होईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून फिरती शौचालये पुरवण्यात येतात. सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात फिरती शौचालयांची मागणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या २४ फिरत्या शौचालयांसाठी श्री साई इंडस्ट्रीज ही कंपनी निविदेत पात्र ठरली. या कंपनीला विविध करांसह १ कोटी २३ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

हेही वाचा –

मुंबई-पुणे हायवेवर अपघात; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर काळाचा घाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -