घरमुंबईतब्बल १६ शस्त्रक्रिया करुन वाचवला २५ वर्षीय तरुणाचा हात

तब्बल १६ शस्त्रक्रिया करुन वाचवला २५ वर्षीय तरुणाचा हात

Subscribe

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका २५ वर्षीय तरुणाच्या हातावर एकूण १६ शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉक्टरांना त्याचा हात वाचवण्यात मोठे यश आले आहे.

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका २५ वर्षीय तरुणाच्या हातावर एकूण १६ शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉक्टरांना त्याचा हात वाचवण्यात मोठे यश आले आहे. घाटकोपरमध्ये राहणारा प्रतिक जोशी कामावरून घरी परतत होता. वडाळा ट्रक टर्मिनलजवळ असताना वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला मागून धडक दिली आणि ट्रक त्याच्या हातावरून आणि मनगटावरून गेला. स्थानिक लोकांनी त्याला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हाताची परिस्थिती पाहता प्रतिकचा जीव वाचवण्यासाठी हात कापावा लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. जेव्हा त्याचे कुटुंबिय तेथे पोहोचले तेव्हा त्याचा हात वाचवण्यासाठी काहीच आशा शिल्लक नव्हती. त्यानंतर कुटुंबियांनी परळच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात त्याला दाखल केले.

हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तात्काळ त्याला ऑपरेशन विभागात दाखल केले. त्यानंतर काही तपासण्या केल्या गेल्या. त्यानंतर, अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे प्रतिकच्या कुटुंबियांना समजावले. याविषयी अधिक माहिती देताना ग्लोबल हॉस्पिटलचे कन्सल्टंट प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रस्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. निलेश सातभाई यांनी सांगितलं की, “१ एप्रिलला प्रतिकला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्या डाव्या हाताच्या मनगट ते कोपरापर्यंतचा भाग) आणि मनगटाचा भाग चिरडला गेला होता. त्याचा अंगठा आणि पहिलं बोट वाचवता येणे शक्य नव्हते. शिवाय, त्वचा आणि स्नायू अजिबात शिल्लक नव्हते. त्याचप्रमाणे त्याच्या मनगटाला आणि हाताला अनेक फ्रॅक्चर्स होते तेही निखळलेले होते. त्यामुळे, त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं कठीण होतं.”

- Advertisement -

रुग्णावर ६ आठवड्यांच्या कालावधीत १६ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मल्टिपल वूंड डिब्रिजमेंट (जखम बरी करण्यासाठी नेक्रॉटिक ऊती काढून टाकणे), मनगट आणि बोटांच्या फ्रॅक्चरवर उपचार करून त्यात प्लेट्स आणि वायर घालणे इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश होता. आम्ही मायक्रोव्हॅस्क्युलर फ्री टिश्यू ट्रान्सफर (फ्लॅप कव्हर) ही शस्त्रक्रिया सुद्धा केली. या अपघातात निघून गेलेल्या त्वचेच्या आणि मऊ ऊतीच्या जागी मांडीची आणि पोटाची त्वचा लावण्यात आली. जखम खोल असल्याने ती भरून काढण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर वूंड थेरपीनंतर स्कीन ग्राफ्टिंगही करण्यात आले.” असंही डॉ. सातभाई यांनी सांगितले. प्रतिकला ३० मेला डिस्चार्ज देण्यात आला आणि आता तो एक चांगलं आयुष्य जगत असून त्याच्या हाताच्या क्रिया ही योग्यरित्या होत आहे.

हेही वाचा –

रोइंगपटू भोकनळ याच्यावरील गुन्हा रद्द

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि आदित्यच्या यात्रेला राष्ट्रवादीकडून ‘शिवस्वराज्य यात्रे’चे उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -