घरमुंबई२६/११ दहशतवादी हल्ला: याच पुलावरुन कसाबने केला होता गोळीबार

२६/११ दहशतवादी हल्ला: याच पुलावरुन कसाबने केला होता गोळीबार

Subscribe

कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माइल यांनी याच पुलावरुन गोळीबार करत ग्रेनेड फेकले होते.

सीएसएमटी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू तर ३५ पेक्षा अधिक जण जखमी झाले. या पुलवारुन मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी गोळीबार करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यातील कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माइल यांनी गोळीबार करत ग्रेनेड फेकले होते. त्यानंतर दोघेही या पुलावरुन उतरुन कामा हॉस्पिटलकडे गेले होते. ही दुर्घटना घडल्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.

पुलावरुन कामा हॉस्पिटलकडे गेले होते दहशतवादी

ज्यावेळी अजमल कसाबने या पुलावरुन गोळीबार केला होता त्यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने फोटो काढला होता. ज्या बिल्डिंगमधून प्रत्यक्षदर्शीने फोटो काढला त्यावेळी फ्लॅश उडाल्याने कसाबने खिडकीच्या दिशेनेही गोळी झाडली होती. हा फोटो समोर आल्यानंतर हा दहशतवादी कसाब असल्याचे समोर आले होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीदरम्यान हा फोटो पुरावा म्हणून वापरला होता. या हल्ल्यातील एकमेव दहशतवादी जिवंत सापडला होता. कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती.

- Advertisement -

असा झाला होता दहशतवादी हल्ला

२६/११ च्या या दहशतवादी हल्याला १० वर्ष पूर्ण झाले आहे. लष्कर-ए-तोएबा या दशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होतात. ४ दिवस हा हल्ला सुरु होता. २६ नोव्हेंबरला सुरु झालेला हा हल्ला २९ नोव्हेंबरलाच थांबला. या हल्ल्यात १६४ जणांचा मृत्यू झाला होता तर ३०८ जण जखमी झाले होते. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर हे पोलीस अधिकारी शहीद झाले होते. पोलिसांच्या गाडीत बसून कसाब आणि त्याचा साथीदार पुढे निघून गेले. नंतर स्कोडा गाडीतून गिरगाव चौपाटीच्या दिशेने येणारा कसाब जिवंत सापडला तर अबू इस्माईलला गोळ्या झाडून पोलिसांनी ठार केले. य झटापटीत पोलीस तुकाराम ओंबळे हे शहीद झाले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -