घरताज्या घडामोडीअबब! इंजिनिअर तरुणाने घरातच बनवली गांजा उत्पादनाची प्रयोगशाळा

अबब! इंजिनिअर तरुणाने घरातच बनवली गांजा उत्पादनाची प्रयोगशाळा

Subscribe

तरुणाने केली इंजिनिअरिंग गांजा लागवडीची

घरातच अत्याधुनिक पद्धतीने गांजा उत्पादन करुन त्या गांजाची हायफाय सोसायटीसह कॉलेज तरुणांना विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी इंजिनिअरचा विद्यार्थी असलेल्या निखील सतीश शर्मा या २६ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निखीलकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाख रुपयांचे उच्च प्रतीचा गांजासह इतर साहित्य जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले. चेंबूर येथील आरसीएफ परिसरात गांजा विक्री करणारी एक टोळी सक्रिय असून ही टोळी कॉलेज तरुणांना गांजा पुरविते अशी माहिती युनिट तीनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी अशोक खोत यांच्या पथकातील नितीन पाटील, सोनाली भारते, गजानन भारती, मोहसीन पठाण, दिपक चव्हाण, शिवाजी जाधव, मंगेश पवार, भास्कर गायकवाड, यलप्पा तांबडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी तिथे निखील हा आला होता. त्याला पोलिसांनी हटकले असता तो पळू लागला. यावेळी पळून जाणार्‍या निखीलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक किलो 54 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचा गांजा सापडला.

- Advertisement -

या गांजाची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासात त्याने हा गांजा त्याच्या एका मित्राच्या घरात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम या अत्याधुनिक पद्धतीने लागण करुन उत्पादन केले होते. त्यासाठी आवश्यक असलेले तीन हायड्रोपोनिक ग्रो सिस्टमचे टेंट, कुंड्या, एलईडी लाईट्स, टायमर यंत्रणा, पीएच सॉईल टेस्टर, आर्द्रता मापक, हायड्रोपोनिक न्यूटियंटस वेगवेगळ्या गाांजाच्या बिया, बी उगवण्यासाठी पेपर टॉवेल आदी सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ganja in home
गांजा लागवडीची प्रयोगशाळा

विदेशातून मागवले साहित्य

यातील काही साहित्य त्याने विदेशातून ऑर्डर करुन मागविले होते. निखील हा इंजिनिअरचा विद्यार्थी असून त्याचे सर्व मित्र हायफाय सोसायटीमध्ये राहतात. आपल्या हुशारीचा वापर त्याने गांजाची अत्याधुनिक उत्पादन सुरु केले होते. सोशल मीडियाच्या माध्यातून त्याने कशा प्रकारे घरात गांजा उत्पादन करता येईल याचा अभ्यास केला होता. त्याने तयार केलेल्या एक ग्रॅम गांजाची किंमत तीन हजार रुपये आहे. हा गांजा तो हायफाय सोसायटीसह कॉलेज तरुणांना पुरविण्याचे काम करीत होता. गेल्या एक वर्षांपासून तो त्याच्या मित्राच्या मदतीने घरात गांजाचे उत्पादन करीत असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -