घरमुंबई२६ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

२६ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

Subscribe

एका २६ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे चार रुग्णांचा प्राण वाचला आहे.

अवयवदानातून ८ जणांचे प्राण वाचतात, हे सर्वश्रूत होत आहे. सध्या अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पुण्यातील ससून जनरल रुग्णालयात एका २६ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. अवयवदान केलेला २६ वर्षीय व्यक्ती एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. १४ फेब्रुवारी या दिवशी त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील उपचारांसाठी त्याला ससून जनरल रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने या व्यक्तीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. डॉक्टर आणि सन्मवयकांच्या टीमने केलेल्या समुपदेशानंतर या व्यक्तीच्या कुटुंबाने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

चार रुग्णांना मिळाले जीवनदान

कुटुंबियांच्या परवानगीनंतर या व्यक्तीचं हृदय, स्वादुपिंड आणि दोन्ही किडनी हे अवयवदान करण्यात आले. हृदय आणि स्वादुपिंड खासगी रूग्णालयातील रूग्णाला दान करण्यात आलं असून एक किडनी नाशिकच्या रूग्णालयात दान करण्यात आली. तर, दुसरी किडनी ससून जनरल रूग्णालयातील रूग्णाला देण्यात आली आहे.

हे रूग्णालयातील १८ वं किडनी प्रत्यारोपण होतं. अवयवदानाच्या मोहिमेत आमचा सहभाग असल्याने आम्हाला याचा आनंद आहे.
– डॉ. मुरलीधर तांबे, ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -