घरमुंबईराज्यातील २७ पॉलिटेक्निक कॉलेज होणार बंद

राज्यातील २७ पॉलिटेक्निक कॉलेज होणार बंद

Subscribe

दहावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमासाठी ओढा असायचा. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हा ओढा कमी झाल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात कॉलेजांमधील जागा रिक्त राहत आहेत. जागा रिक्त राहत असल्याने प्रशासनाला कॉलेज चालवणे अवघड जात आहे. जागा रिक्त राहत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने राज्यातील तब्बल 27 कॉलेज बंद करण्याचे प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी संस्थाचालकांनी दाखल केले आहेत. यामुळे राज्यातील तब्बल ५ हजार जागा कमी होण्याची शक्यता आहे.

पॉलिटेक्निक पदविकेचे शिक्षण घेतल्यानंतर उत्तम नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना डिग्रीला प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे पॉलिटेक्निक व पुन्हा डिग्रीचा अभ्यासक्रम करणे यापेक्षा विद्यार्थी सध्या थेट डिग्री अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा देऊन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतानाही पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार्‍यांची संख्येत काही वर्षांपासून घट झाली आहे.

- Advertisement -

गतवर्षी तब्बल 72 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. जागा रिक्त राहिल्याने कॉलेजांचे मोठ्या प्रमाणात होणार्‍या नुकसानामुळे संस्थाचालकांना कॉलेज चालवणे मुश्लिक होत आहे. दरवर्षी होत असलेल्या आर्थिक फटक्यामुळे राज्यातील 27 संस्थाचालकांनी कॉलेज बंद करण्याचे प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवले आहेत. या प्रस्तावाबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विविध बाबी तपासून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. कॉलेजमधील शिकणारे विद्यार्थी, त्यांना मिळणार्‍या सुविधा, कर्मचारी व अन्य बाबी तपासून कॉलेज बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्या येतो. त्यामुळे संस्थाचालकांनी कॉलेज बंद करण्याचे प्रस्ताव जरी तंत्रशिक्षण संचालनलायकडे पाठवले असले तरी ती थेट बंद करता येत नाहीत. ही प्रक्रिया टप्याटप्याने राबवण्यात येते. विद्यार्थीच नसल्यास कॉलेज बंद करण्यात कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्येनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.

प्रस्ताव पाठवलेले कॉलेज
<बालाजी पॉलिटेक्निक, यवतमाळ <नव विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, अमरावती <सितारामजी मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्निक, परभणी <डी. बी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, लातूर <कै. हरीभाऊ वरपूडकर पॉलिटेक्निक, परभणी <रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, नांदेड <प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी ऑफ पॉलिटेक्निक, रायगड <डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, नेरूळ <हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट बोर्ड, चर्चगेट <अदवूत डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कुही <के.डी.के. पॉलिटेक्निक, उम्रेर<श्री. दत्ता मेघे पॉलिटेक्निक, नागपूर <ओम पॉलिटेक्निक, वर्धा <जी. एच. रायसोनी पॉलिटेक्निक, जळगाव <महाराष्ट्र शेतकरी सेवामंडळ त्रंबकराव शेजवल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नाशिक <श्री संत मुक्ताबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक), जळगाव <श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, जळगाव <श्री संत मुक्ताबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (फार्मसी), जळगाव <अशोकराव माने पॉलिटेक्निक, कोल्हापूर <श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पॉलिटेक्निक, सोलापूर <लेट. नारायणदास भवानदास छबदा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरींग अ‍ॅण्ड टेक्निकल, सातारा <डॉ. जे.जे. मगदूम पॉलिटेक्निक, जयसिंगपूर <सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, नागपूर <केडीके नागपूर पॉलिटेक्निक, नागपूर <बाबूरावजी तिडके पॉलिटेक्निक, नागपूर <श्री बहुलालजी अग्निहोत्री स्कूल ऑफ टेक्नोलॉजी, वर्धा <दत्तकला पॉलिटेक्निक, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -