घरमुंबई27 शालेय वस्तूंपासून विद्यार्थी वंचित

27 शालेय वस्तूंपासून विद्यार्थी वंचित

Subscribe

शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये अद्यापही 27 शालेय वस्तू पोहचल्याच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ज्या शाळांमध्ये साहित्य पोचले आहे, त्यातील अनेक शाळांमधील 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांना साहित्यच मिळाले नाही. 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना सर्व साहित्य मिळेल असा दावा पालिकेकडून करण्यात येत असला तरी आठवडाभरात साहित्या मिळेल याची विद्यार्थी व पालकांना शाश्वती नाही. शैक्षणिक साहित्य नसल्याने पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शैक्षणिक साहित्याशिवाय शिक्षण घेण्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी पालिकेकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना 27 शाळेपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. यामध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश, बूट, कंपास पेटी, पेन्सिल यांसारख्या 27 वस्तूंचा समावेश असतो. त्यामुळे आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. यावर्षी 17 जुलैला शाळा सुरू झाल्या त्यादिवशी मोठा गाजावाजा करत स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते अनेक शाळांमध्ये शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

तसेच अन्य शाळांमध्येही लवकरच वाटप करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. परंतु शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अनेक शाळांमध्ये अद्याप कोणतेच साहित्य पोचलेले नाही. ज्या शाळांमध्ये साहित्य पोचले आहे तेही अपुरे आहे. अपुर्‍या साहित्य पुरवठा झालेल्या शाळांमध्ये 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांना साहित्यच मिळालेलेच नाही. अपुरे साहित्य आल्याने कोणत्या विद्यार्थ्याला साहित्य द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 24 मे पर्यंत होती. त्यामूळे वस्तू खरेदीला स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाली नव्हती. 24 मे नंतर मंजुरी मिळाल्यावर खरेदी ऑर्डर काढण्यात आली. त्या प्रक्रियेला 45 ते 60 दिवस लागतात. त्यामुळे वस्तू मिळण्यास विलंब झाला आहे. परंतु 15 ऑगस्टपर्यंत सर्व शाळांमध्ये वस्तू पोहचतील. – प्रकाश चर्‍हाटे, उपशिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

- Advertisement -

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -