Mumbai Corona: आज दिवसभरात २,८२३ नवे रूग्ण; ४८ जणांचा कोरोनामुळे बळी

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २२ हजार ७६१ वर

Coronavirus Update Mumbai 30 May
मुंबईची आजची आकडेवारी

मुंबईत आज कोरोनाचे २ हजार ८२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २२ हजार ७६१ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार २९३ वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ९३३ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८६ हजार ६७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २४ हजार ७८९ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आज २ हजार ८२३ नवे रुग्ण सापडले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३४ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. ३८ जण हे ६० वर्षांवरील, तर १० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३% आहे.

सध्या धारावीत १८७ रूग्णांवर उपचार सुरू

मुंबईतील धारावी भागात आज ८ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर धारावीतील बाधितांचा आकडा हा ३ हजार ३०० वर जाऊन पोहोचला आहे. सध्या धारावीत १८७ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर २ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात १३,३९५ नवे रुग्ण, ३५८ जणांचा मृत्यू