घरमुंबईमुंबई शहरातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई शहरातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

Subscribe

काही दिवसांपूर्वीच राज्यातल्या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता मुंबईतही पोलीस विभागात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई शहरातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सांताक्रुजच्या दत्तात्रय भरगुडे यांची वांद्रे तर काही दिवसांपासून रिक्त असलेल्या डी. एन. नगर विभागात भूषण राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर पोलीस अधिकार्‍यांमध्ये गुन्हे शाखेचे अभय शास्त्री यांची अंधेरी विभाग, शेखर तोरे यांची गुन्हे शाखा, रमेश गावीत यांची वाहतूक विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभाकर लोके आणि विनोद शिंदे यांची गुन्हे शाखा, विशेष शाखा एकचे प्रकाश जाधव यांची आर्थिक गुन्हे शाखा तर भिमराव इंदुलकर यांची माटुंगा विभाग, संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे सुरेश पाटील यांची पश्चिम नियंत्रण कक्ष तर प्रविण चिंचाळकर यांची संरक्षण व सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईसह राज्यभरातील ८९ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या!

याशिवाय, सशस्त्र विभागाच्या संगीता पाटील यांची गुन्हे शाखा, विमानतळ विभागाचे सुनिल शेजवळ यांची विमानतळ विभाग, समतानगर विभागाचे सुभाष वेळे यांची सशस्त्र विभाग, सांताक्रुज विभागाचे दत्तात्रय भरगुडे यांची वांद्रे विभाग, बोरिवली विभागाचे नंदकिशोर मोरे, देवनार विभागाचे दिनेश देसाई यांची अनुक्रमे विशेष शाखा एक, माटुंगा विभागाचे अस्मिता भोगले तर येलोगेट विभागाच्या लता दोंदे यांची अनुक्रमे वाहतूक विभाग, विशेष शाखा एकचे सुनिल वडके यांची बोरिवली विभाग, गुन्हे शाखेचे भूषण राणे यांची डी. एन नगर विभाग, सशस्त्र विभागाचे विश्वनाथ भुजबळ यांची देवनार विभाग, पूर्व नियंत्रण कक्षाचे विलास कानाडे यांची विशेष शाखा एक, सशस्त्र विभागाचे अरविंद वाढणकर यांची आर्थिक गुन्हे शाखा, राजभवन सुरक्षा विभागाचे भाऊसाहेब गिते यांची विमानतळ विभाग, मुख्यालय दोनचे विनय बगाडे यांची नेहरुनगर विभाग, विशेष शाखा दोनचे संजय शिंदे यांची ठाणे शहर, घाटकोपर विभागाचे माणिकसिंह पाटील यांची मुख्यालय दोन तर संरक्षण व सुरक्षा विभागाचे सुहास रायकर यांची सांताक्रुज विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

दोन पोलीस निरीक्षकांमध्ये विजयकुमार रणजीत कुरीय (ओशिवरा पोलीस ठाणे) आणि प्रशांत ईश्वरलाल अहिरे (मंत्रायल सुरक्षा विभाग) यांची विशेष सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -