घरमुंबईकेईएममध्ये डॉक्टरची आत्महत्या

केईएममध्ये डॉक्टरची आत्महत्या

Subscribe

डॉक्टरच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आज केईएममध्ये २९ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रणय जयस्वाल असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉक्टरच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

डॉ. प्रणय जयस्वाल याने विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवलं. याप्रकरणाचा पोलीस तपास करत असून घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

डॉ. प्रणय जयस्वाल यांच्याबद्दल

मूळचे अमरावतीचे असणारे डॉ. प्रणय जयस्वाल यांनी केईएम हॉस्पिटलमधून डिग्री परिक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -