घरमुंबई३ कोटींची फसवणुक; कंपनी संचालकाला अटक

३ कोटींची फसवणुक; कंपनी संचालकाला अटक

Subscribe

तीन कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका कंपनीच्या संचालकाला मंगळवारी अटक केली आहे. अमरिश हसमुखलाल सोनी असं या संचालकाचे नाव आहे. आरोपीला अंधेरी येथील लोकल कोर्टामध्ये हजर केले असता कोर्टाने त्याला २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यामध्ये तीन जणांना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे. त्यामध्ये हर्षद रतीलाल सोनी, गिता हर्षद सोनी आणि जयश्री अमरिश सोनी यांचा समावेश आहे. हे तिघेही विनम्र डेव्हलरचे भागिदार आणि संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय आहे घटना?

याप्रकरणी तक्रार केलली महिला सना सुलेमान चौहाण ही तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील ओशिवरा परिसरामध्ये राहते. तिचे पती अमेरिकेत वास्तव्यास आहेत. तिथेच त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. ९ वर्षापूर्वी त्यांच्या परिचित किरीट सोनी यांनी त्यांचे नातेवाईक हर्षद सोनी यांच्यासोबत ओळख करुन दिली. या ओळखीनंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. हर्षदने त्याची पत्नीसह घरातील सर्व मंडळींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती. त्यानंतर ते सर्व जण एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान हर्षदने त्यांच्या मालकीची विनम्र डेव्हलपर्स नावाची एक कंपनी असून या कंपनीचे एक कार्यालय सांताक्रुझ येथे असल्याचे सांगितले. त्यांच्या मालकीच्या सांताक्रुझ परिसरामध्ये एक फ्लॅट आहे. त्याठिकाणी जुनी बिल्डिंग खाली करण्याचे काम सुरु आहे. याठिकाणी त्यांना स्वस्तामध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्यांना टप्प्या टप्प्याने पैसे भरण्यास सांगितले होते. बिल्डिंगचे काम सुरु असून दीड ते दोन वर्षात त्यांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे विश्वासत घेऊन सांगितले. त्याचा हा प्रपोजल चांगला वाटल्यामुळे त्यांनी या बिल्डिंगमध्ये दोन फ्लॅट बुक केले होते.

- Advertisement -

एका आरोपीला अटक

दरम्यान, या दोन्ही फ्लॅटसाठी त्यांनी त्यांच्या कंपनीला सुमारे तीन कोटी रुपये रोख, धनादेश आणि आरटीजीएसद्वारे दिले होते. मात्र फ्लॅटचा दिलेल्या मुदतीत ताबा दिला नाही. तसेच त्यांनी बुक केलेल्या दोन्ही फ्लॅटची त्यांनी परस्पर विक्री करुन फसवणुक केल्याचे नंतर त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी या चौघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच मंगळवारी अमरिश सोनी याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -