घरCORONA UPDATEधक्कदायक! चेंबूरमध्ये तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना

धक्कदायक! चेंबूरमध्ये तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना

Subscribe

चेंबूरमधील एका रुग्णालयात तीन दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा आकडा राज्यात ३३५ वर पोहोचला आहे. तर मुंबईत आज ३० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा १८१ वर गेला आहे. यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेंबूरमधील एका रुग्णालयात तीन दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर डिलिव्हरी वॉर्डात कोरोना रुग्ण असल्याचा आरोप कोरोना रुग्णाच्या पतीने केला आहे.

नेमके काय घडले?

- Advertisement -

चेंबूरमध्ये एका तीन दिवसांच्या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोघांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, डॉक्टरांनी आपल्या बाळाची प्रकृती नाजूक आहे, असे सांगितल्यामुळे रुग्णाच्या पतीने रुग्णालयात एक व्हिडिओ तायर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना रुग्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही यात लक्ष द्या, अशी विनंती देखील केली आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

- Advertisement -

मुंबई – १८१
पुणे – ३८
पिंपरी चिंचवड – १२
सांगली – २५
नागपूर – १६
कल्याण – १०
नवी मुंबई – ८
अहमदनगर – ८
ठाणे – ८
वसई विरार – ६
यवतमाळ – ४
बुलडाणा – ४
पनवेल – २
सातारा – २
कोल्हापूर – २
पालघर- १
उल्हासनगर – १
गोंदिया – १
औरंगाबाद – १
सिंधुदुर्ग – १
रत्नागिरी – १
जळगाव- १
नाशिक – १
इतर राज्य (गुजरात) – १

एकूण ३३५


हेही वाचा  – वरळी कोळीवाड्यात १२ पॉझिटिव्ह रुग्ण; १०८ जण पोद्दारमधील क्वॉरंटाईनमध्ये


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -