घरताज्या घडामोडीCoronavirus: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार!

Coronavirus: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार!

Subscribe

कोरोना काळ सुरु झाल्यापासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणे हॉटस्पॉट करण्यात आली होत. पण आता मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव भाव कमी होत आहे. त्यामुळे मुंबईतील काही हॉटस्पॉट ठिकाणे कोरोनामुक्त झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार गेला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून ५३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ४७१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार २१० जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ८० हजार ८५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान १ जुलै २०२० रोजी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख झाला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२०ला मुंबईतील बाधितांचा आकडा २ लाख पार झाला. आता मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांवर पोहोचला आहे.

संपूर्ण राज्यात आज दिवसभरात ३ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ७८ हजार ४४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. तसेच सध्या ५२ हजार ३६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात ३,५५६ नवे रुग्ण, ७० जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -