राज्यात दरवर्षी ३ लाखांहून अधिक रुग्णांना होतो डेंग्यू

राज्यात दरवर्षी ३ लाखांहून अधिक डेंग्यूची रूग्णांची नोंद होते, तर मृत्यू होण्याची ही संख्या अधिक आहे.

Mumbai
प्रतिनिधीक फोटो
राज्यात दरवर्षी ३ लाखांहून अधिक रुग्णांना होतो डेंग्यू

राज्यात कडाक्याच्या उन्हासोबत काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. अशा वातावरणात सर्वात जास्त असंसर्गजन्य आजार बळावण्याची भीती असते. या काळात डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. शिवाय, डासांपासून कशा पद्धतीने प्रतिबंध घालता येईल यासाठी महापालिकाही अनेकदा जनजागृतीचे उपक्रम राबवत असते. पण असे जरी असले तरी राज्यात दरवर्षी ३ लाखांहून अधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होते. त्यातून मृत्यू होण्याची ही संख्या अधिक आहे.

२०१७-२०१८ ची आकडेवारी

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षातील बाराही महिने डेंग्युचे रुग्ण आढळतात. ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या काळात डेंग्युचे तब्बल ३.२५ लाख रुग्ण आढळले म्हणजेच दर महिना सरासरी २७ हजार रुग्ण आढळतात. पावसाळा आणि त्यानंतरच्या काही काळात हे डास अधिक सक्रिय असतात. त्यामुळे फक्त पावसाळातच नाही तर इतर वेळीसुद्धा डेंग्युपासून कुटुंबाला सुरक्षित ठेवा, असा सल्ला डॉक्टर्स देतात.

पैदास टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

डेंग्यु पसरवणाऱ्या अदिस डासांची पैदास घरातील ताज्या पाण्यातही होऊ शकते. फुलदाण्या, कुलर, एसी ट्रे, फ्रीजचा ट्रे, न झाकलेल्या बादल्या आणि पाण्याची भांडी ही या डासांसाठी उत्तम जागा असते. घरात कुठेही पाणी उघडे ठेवू नका. सर्व ठिकाणचे अनावश्यक पाणी ओतून टाका. पाणी साठवताना त्यावर योग्य पद्धतीने झाकण ठेवावे. घराबाहेर पडताना नेहमी डासांच्या औषधांचा वापर करा, असा सल्ला डॉक्टर्स देतात.

या रक्तगटातील व्यक्तींना डास चावण्याची शक्यता

रक्तातील साखरेने नव्हे तर आपल्या श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईड, शरीराची उष्णता आणि शरीरातून स्रवणारे लॅक्टिक अॅसिड यामुळे डास आकर्षित होतात. ए पॉझिटीव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ओ पॉझिटीव्ह रक्त गट असणाऱ्यांना डास चावण्याची शक्यता दुप्पट असते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, एखाद्याला अजिबातच डास चावणार नाहीत, याचे कोणतेही नियम आजवर सिद्ध झालेले नाहीत. अगदी, एकदाच एखादा डास चावल्यानेही मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया आणि डासांपासून होणारे इतर आजार होऊ शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here