एकतर्फी प्रेमातून ३ वर्षीय बालकाचे अपहरण

उल्हासनगर मध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणाने ३ वर्षीय बालकाचे अपहरण केले. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीचा छडालावत त्याला अटक केले आहे.

Ulhasnagar
ulhas nagar 3 year child kidnap
उल्हासनगर तीन वर्षाचा मुलाच अपहरण

उल्हासनगरमध्ये एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या एका तरुणाने ३ वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. अपहरणकर्त्याचे या ३ वर्षीय मुलाच्या मावशीवर एकतर्फी प्रेम होते. तिला एकांतात बोलविण्यासाठी त्याने हा डाव रचला होता. दरम्यान या घटनेची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळताच २४ तासांच्या आत सापळा रचून आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उल्हासनगर येथील सह्याद्रीनगर टेकडी येथे राहणाऱ्या भावेश (३) या मुलाचे त्याच्या राहत्या घराजवळून काल सकाळी अज्ञात इसमाने अपहरण केले होते. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास विठ्ठलवाडी पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे शाखा घटक ४ चे पोलीसही करीत होते.

२४ तासात आरोपी गजाआड

पोलिसांनी भावेशचा शोध सुरू केला. दरम्यान भावेशच्या मावशीच्या मोबाईल वर दुपारी आरोपी सूरज दारा सिंग (20) याने फोन करून तिला कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ एकटेच भेटण्यास सांगितले होते. पोलिसांनी भावेशच्या मावशीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत पोलिसांचे एक पथक कुर्ल्यासाठी रवाना झाले. दरम्यान आरोपीने भेटण्याचे ठिकाण बदलून विक्रोळी आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान भेटण्यास सांगितले. आरोपी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक ५ च्या इंडिकेटर खाली भावेशच्या मावशीची वाट बघत होता. पोलिसांनी तेथे सापळा रचत आरोपी सूरजसिंग दिसताच त्याला अटक केली आणि भावेशची सुटका केली. आरोपी सूरजसिंग हा मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे आणि पथकाने अपहरणकर्त्याला २४ तासांच्या आत अटक करून ३ वर्षीय भावेशचा जीव वाचविला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here