घरमुंबईगणपतीसाठी एकत्र आल्याने एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

गणपतीसाठी एकत्र आल्याने एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

Subscribe

कल्याणमध्ये कोरोनाचा कहर

कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ माजली आहे. कल्याणमधील जोशी बाग येथे एक 40 जणांचा परिवार गणपतीसाठी एकत्र आला होता. त्यातील एका मुलाला लागण झाली. त्यातून पुढे 40 पैकी 30 जण पॉझिटिव्ह आले. याला पालिका साथ रोग नियंत्रक अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे.

लॉकडाऊन नंतर गणेशोत्सव या काळात नियम शिथिल होताच कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला असून एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, त्या कुटुंबातील सदस्याने माहिती दिली आहे की, आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र राहत असून नियमांचे पालन करत होतो. गणपतीसाठी एकत्र आलो हे बोलणे चुकीचे आहे. घरातील एकाला लागण झाल्याने सर्वांची चाचणी केली असता पॉझिटिव्ह आल्याने उपचार घेत आहोत.

- Advertisement -

मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू झाले. त्याचे टप्प्याटप्प्याने शिथिल आणि आलेला गणेशोत्सव या काळात नियमांचे पालन न झाल्याने कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. कल्याण पश्चिममधील जोशी बागेत 34 जणांचे एकत्र कुटुंब राहते. त्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी चाचणी केली असता 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून 3 जणांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला असून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची तब्येत उत्तम असल्याची माहिती संबंधित कुटुंबातील सदस्यांनी दिली .

कल्याण-डोंबिवली शहरात प्रतिदिन 400हून अधिक कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असून आतापर्यंत 30 हजार हून अधिक रुग्णाची संख्या झाली आहे. रुग्णांची बरे होणे आणि डिस्चार्ज संख्या समाधानकारक असली तरी नव्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

नगरसेवकांनाही कोरोनाची लागण…
शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केल्याने समोर आले आहे.

दरम्यान झोपडपट्टी परिसर मध्ये कोरोना बाधित संख्या नियंत्रण मध्ये येत असताना मोठ्या संकुलात संख्या वाढ ही पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे .संकुल मधील नागरिक कोरोना बाधित झाल्यावर घरी राहून उपचार घेत नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना बाधित संख्या वाढत असल्याचे समजते .संकुल मधील रुग्ण वाढ रोखण्यासाठी झिरो मिशन आणि अँटीजेंट टेस्ट मोहीम वाढविण्यात आली असून यामुळे रुग्ण संख्या कमी होते का याकडे लक्ष्य लागले आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -