घरमुंबईस्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने ३३ लाख लुटले

स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने ३३ लाख लुटले

Subscribe

फ्लॅट विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी परेश गोपीनाथ राव या 44 वर्षीय आरोपीला शनिवारी डी.एन. नगर पोलिसांनी अटक केली. परेशसह त्याची पत्नी सीमा राव आणि सहकारी संतोष परब यांनी एका जोडप्याला दोन फ्लॅट स्वस्तात देण्याच्या नावाखाली 33 लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यात परेश सध्या पोलीस कोठडी असून त्याच्या पत्नीसह सहकार्‍याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार लॉईड अनिल टेलीस हे अंधेरीतील विरा देसाई रोडवरील प्रथमेश कॉम्प्लेक्समध्ये राहत असून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांची परेश राव आणि संतोष परब यांच्याशी ओळख झाली होती. आपण फ्लॅट शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या दोघांनी परेश रावची पत्नी सीमा राव ही रिअल इस्टेटमध्ये काम करीत असून तिने फिल्म इंडस्ट्रिजमध्ये पैसे गुंतवविण्याचे काम करते. त्यांच्या काही कंपन्याही असल्याचेही त्यांनी सांगितले होते. अंधेरी येथे त्यांना स्वस्तात फ्लॅटचे आमिष दाखवून त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर लॉईड हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना अंधेरीतील ऑफ यारी रोडवरील पंचमुखी सहकारी सोसायटीमध्ये दोन फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या चर्चेनंतर त्यांनी संबंधित दोन्ही फ्लॅट दाखविले. यावेळी संतोषने त्यांना एका फ्लॅटची किंमत 58 लाख रुपये असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी फ्लॅट बुकींगसाठी त्यांच्याकडून तीन लाख रुपये व नंतर चार लाख रुपये घेतले होते.

- Advertisement -

काही दिवसांनी लॉईड यांनी त्यांच्यासह पत्नी आणि बहिणीच्या खात्यातून परेश आणि सीमा राव यांच्या खात्यात 39 लाख 9 हजार रुपये जमा केले होते. पैसे जमा होताच त्यांनी फ्लॅटचा करारनामा आणि रजिस्ट्रेशनसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र वारंवार बोलणी करुनही त्यांनी करारनामा आणि रजिस्ट्रेशन केले नाही. ते दोघेही टोलवाटोलवी करीत असल्याने अखेर लॉईड यांनी त्यांच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे या दोघांनी त्यांना सहा लाख रुपये परत केले तर उर्वरित पैसे नंतर देतो असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -