घरमुंबईलोअर परेलचा पूल तोडण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक

लोअर परेलचा पूल तोडण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक

Subscribe

सुरक्षिततेच्या कारणावरून बंद करण्यात आलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल येथील पुलाचा भाग पाडण्यासाठी ब्लॉक घेण्यात येण्याची शक्यता

पश्चिम रेल्वेवरील लोअर परेलचा पूल सुरक्षिततेच्या कारणांवरून बंद करण्यात आलेल्या रेल्वे हद्दीतील भाग पाडण्यासाठी ब्लॉकची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी किमान ३६ तास म्हणजेच दीड दिवसांच्या विशेष पॉवर ब्लॉकची आवश्यकता आहे. लोअर परळ आणि प्रभादेवी स्थानकास जोडणारा हा पूल पाडताना दक्षिण मुंबईकडील लोकल वाहतूक तात्पुरती खंडित करावी लागणार आहे.

२४ जुलैपासून पूल वापरात नाही

पश्चिम रेल्वेने २४ जुलैपासून हा पूल वापरात न आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा पूल नव्याने बांधण्यापूर्वी तो पाडणंही जिकिरीचे काम आहे. रेल्वे हद्दीबाहेरील भागाप्रमाणेच रेल्वे हद्दीतील पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेला प्रचंड कसरत करावी लागणार आहे. रेल्वे हद्दीत पूल असल्याने तो पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मान्यता दिली. पश्चिम रेल्वेने पूल पाडण्यासाठी अद्याप कंत्राटदार नेमलेला नाही. पण, हा पूल पाडण्यासाठी किमान २४ तास ते ३६ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. या चारही मार्गावरील ओव्हरहेड वायर बाजूला काढण्यासह अन्य तांत्रिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत हाती घेण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे. यामध्ये पूल पाडणे नव्हे तर लोकल, मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाच्या अनुषंगानेही नियोजन करावं लागणार आहे.

- Advertisement -

काही गाड्या रद्द करण्याचे निर्णय

मुंबई सेंट्रलच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या दादर, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली किंवा त्या अगोदरच्या टर्मिनसवर थांबवणे, काही गाड्या रद्द करणे आदी निर्णय घ्यावे लागणार आहेत. लोकलच्या वेळापत्रकात बदल करताना प्रवाशांना कमीतकमी त्रास होईल, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करावे लागेल, असंही मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात येतं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -