घरमुंबई१ रुपयाचा फोन कॉल पडला बारा लाखाला

१ रुपयाचा फोन कॉल पडला बारा लाखाला

Subscribe

नवी मुंबईमधील एका सोने व्यापाऱ्याला बारा लाखाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबईमधील एका सोने व्यापाऱ्याला बारा लाखाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आला आहे. दागिन्यांच्या अपहारप्रकरणी चौघांना गुरुवारी एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. प्रितम रमेश भगलट, विशाल माणिक खामकर, महेश मोहन पाटील आणि नितीन ओसवाल अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमके काय घडले?

नवी मुंबईमधील वाशी सेक्टर क्रमांक २९ येथे राहणारे श्रेयांस हिंमतलाल कोठारी हे पंचज्योत सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा सोन्याचा दागिने बनविण्याचा व्यवसाय असून त्यांचे कार्यालय झव्हेरी बाजार येथील धनजी स्ट्रिक इमारतीमध्ये असून ते व्यापार्‍यांच्या ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची बी. टी ओसवाल ज्वेलर्सचे मालक अमीतभाई ओसवाल यांच्याशी ओळख झाली होती. ते त्यांना नेहमीच व्हॉटअप आणि मोबाईलवरुन दागिन्यांची ऑर्डर देत होते. त्यांचे दागिने ते काळबादेवी येथील कृष्ण कुरिअरच्या मदतीने त्यांच्या दुकानात पाठवित होते. ४ मे २०१८ रोजी त्यांना सुरेशभाई नावाच्या एका व्यक्तीने ओसवाल यांच्या दुकानातून बोलत असल्याचे सांगून त्यांना सोन्याच्या बांगड्या आणि चैनचे डिझाईन पाठवून दागिने बनविण्यास सांगितले होते. त्याच्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी सुमारे १२ लाख रुपयांचे ३८० ग्रॅम वजनाच्या बांगड्या आणि चैन कुरिअरद्वारे काळबादेवी येथील दुकानात पाठविले.

- Advertisement -

७ मेला कुरिअरमधून आलेले दागिने बोगस असल्याचे महावीर कोठार यांनी सांगितले होते. त्यानंतर तिथे जाऊन पाहणी केली असता ते दागिने बोगस होते. तसेच सुरेशभाई या व्यक्तीचा मोबाईल बंद होता. हा प्रकार त्यांनी ओसवाल यांना सांगितला असता त्यांच्याकडे सुरेशभाई नावाचा कोणीही कामाला नसल्याचे समजले. या व्यक्तीकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच श्रेयांस कोठारी यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच पळून गेलेल्या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एल. टी मार्ग आणि फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -