घरमुंबईमुंबई मॅरेथॉनला गालबोट; ६४ वर्षीय इसमाचा मृत्यू

मुंबई मॅरेथॉनला गालबोट; ६४ वर्षीय इसमाचा मृत्यू

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी या मॅरेथॉन आयोजन केले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ड्रीम रनला सुरुवात केली आहे. पण मुंबईच्या मॅरेथॉनला गालबोट लागले आहे. स्पर्धेत एका ६४ वर्षीय इसमासा मृत्यू झाला आहे. धावताना हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला आहे.  गजानान मार्लेकर असं या स्पर्धकाचे नाव आहे. त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

गजानन मार्लेकर यांच्याबरोबर आणखी दोनजणांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. हिमांशु ठक्कर (वय ४०) अस या अॅडमिट केलेल्या स्पर्धकाचं नाव आहे.
यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे.
. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचे १७ वे पर्व असून एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिस आहेत. या मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. अर्धमॅरेथॉन महिला गटात उत्तर प्रदेशची पारुल चौधरी हिने प्रथम क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. तर मुंबई कस्टम्सची आरती पाटीलने दुसरा क्रमांक आणि नाशिकच्या मोनिका आथरेचा तिसरा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -