घरमुंबईविक्रोळीमध्ये ट्रकने ४ जणांना चिरडले

विक्रोळीमध्ये ट्रकने ४ जणांना चिरडले

Subscribe

मुंबईतील विक्रोळीमध्ये ट्रक खाली चिरडून ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीच्या पार्कसाईट भागामध्ये ही घटना घडली आहे. ट्रकचे मागचे चाक गटारामध्ये अडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. या दुर्घटनेमध्ये अश्विन हेबारे, विशाल शेलार, चंद्रशेखर मुसळे आणि हमीद शेख या चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

विक्रोळीच्या पार्कसाईट भागामध्ये धान्याने भरलेला ट्रक खाली चार जण चिरडले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री घडली आहे. ट्रकचे चाक गटारात अडकल्यामुळे तो उलटा झाला. याखाली चिरडून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे पार्कसाईट परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -