घरमुंबईउन्हाळाच्या सुट्टीसाठी पश्चिम रेल्वेच्या ५ विशेष गाड्या

उन्हाळाच्या सुट्टीसाठी पश्चिम रेल्वेच्या ५ विशेष गाड्या

Subscribe

उन्हाळाच्या सुट्यानिमित्त मध्य रेल्वे पाठोपाठ आता पश्चिम रेल्वेनेसुद्धा विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून १२ एप्रिलपासून ५ विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहे. या पाच विशेष रेल्वे गाड्याच्या उन्हाळाच्या सुट्टी दरम्यान एकूण १३५ सेवा चालविण्यात येणार आहे. ज्यात मुंबईतून ४ विशेष गाड्या तर एक अहमदाबादहून गाडी असणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गवरील प्रवाशांना उन्हाळयात मोठा दिला मिळणार आहे.

या विशेष रेल्वे गाड्यामध्ये गाडी क्रमांक ०९००५ आणि ०९००६ मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली (साप्ताहिक) सुपरफास्ट एसी विशेष मेल असणार आहे. या एक्स्प्रेसच्या एकूण ४८ फेर्‍या चालविण्यात येणार आहेत. १२ एप्रिल ते ३० जूनपर्यंत दर रविवारी आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून सायंकाळी ४ वाजता गाडी नवी दिल्ली रवाना होणार आहे. १३ एप्रिल ते १ जुलै दर सोमवारी आणि शनिवारी दिल्लीहून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी गाडी मुंबई सेंट्रलसाठी रवाना होणार आहे. गाडी क्रमांक ०९००९ आणि ०९००१० वांद्रे टर्मिनस ते मंगलोर (साप्ताहिक) विशेष गाडी वसई मार्गे १६ फेर्‍या चालविण्यात येणार आहे. १६ एप्रिल ते ४ जून पर्यंत दर मंगळवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी वांद्रे टर्मिनसहून गाडी मंगलोरसाठी रवाना होईल. १७ एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर बुधवारी रात्री ११ वाजता मंगलोरहून गाडी वांद्रे टर्मिनससाठी रवाना होईल.

- Advertisement -

या स्थानकावर असणार थांबा
बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगाव, कारावार, कुमठा, मुरुदेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मुल्कि, सूरतकल या स्थानकावर थांबा आहे.

गांधीधाम साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
गाडी क्रमांक ०९४३३ आणि ०९४३४ वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या २४ फेर्‍या चालविण्यात येणरा आहेत. १३ एप्रिल ते २९ जूनपर्यंत वांद्रे टर्मिनसहून दर शनिवारी मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. तर गांधीधामहून प्रत्येक शनिवारी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी बोरीवली, वापी, सुरत, वडोदरा, आणंद, नडियाद, अहमदाबाद, ध्रांगध्रा, समाखियाली स्थानकावर थांबेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -