घरमुंबईनिवडणूकीआधी ५० हजार मतदारांची नाव वगळली

निवडणूकीआधी ५० हजार मतदारांची नाव वगळली

Subscribe

घरोघरी झालेल्या सर्वेक्षणानंतरची मोहीम

मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मुंबई जिल्ह्यात घरोघरी झालेले सर्वेक्षणही महत्वाचे ठरले आहे. निवडणुकीआधीच याद्यांसाठी घेण्यात आलेल्या मेहनतीमुळे गैरहजर, मृत आणि स्थलांतरीत झालेल्या ५० हजार मतदारांची नाव मतदार यादीतून वगळण्यात मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाला यश मिळाले आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मतदारसंघातून ही नावे वगळण्यात आली आहेत.

एकट्या कुलाबा मतदारसंघातून जवळपास १० हजार नावे वगळण्यात आली आहेत. कुलाब्यातील इमारतीच्या परिसरातील घरोघरी सर्वेक्षण करणे तुलनेने सोपे आहे. पण झोपडीवासीयांच्या परिसरात मात्र अनेक आव्हाने आल्याचे मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकांआधी राज्य निवडणूक आयोगाचा घरोघरी सर्वेक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला तर पुन्हा एकदा हे सर्वेक्षण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दक्षिण मतदारसंघात मृत पावलेल्या मतदारांची आकडेवारी ही जवळपास २० हजार इतकी आहे. मतदार यादीत सर्वाधिक मृत पावलेले असे मतदार हे मलबार हिल मधून १०८७६ इतके आहेत. दक्षिण मध्य मतदारसंघात सर्वाधिक अशी १०६०३ नावे ही वडाळा विधानसभा मतदारसंघातून वगळण्यात आली. दक्षिण मध्य मतदारसंघात स्थलांतर केलेल्या मतदारांची आकडेवारी ही सर्वाधिक आहे. १४ हजार ९७१ इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार अणुशक्ती नगर, चेंबुर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम या मतदारसंघातून स्थलांतरीत झाले आहेत. मतदारांच्या घऱोघरी झालेल्या सर्वेक्षणात दक्षिण मध्य मतदारसंघात ७१४७ मतदार गैरहजर आढळून आले आहेत. तर दक्षिण मुंबईत गैरहजर असणार्‍या मतदारांची आकडेवारी ही ९४४७ इतकी आहे.

सेवानिवृत्तीनंतरही अधिकारी याद्यांवर
कुलाबा परिसरातील रेल्वे तसेच शासकीय अधिकार्‍यांसाठीच्या इमारतींमध्येही वर्षानुर्षे अधिकार्‍यांची नावे तशीच असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. हे अधिकारी आपल्या सेवेतून निवृत् होऊन दहापेक्षा अधिक वर्षे झालेली असतानाही मतदार याद्यांमध्ये नावे ही तशीच असल्याचे आढळले आहे. त्यामध्ये कुलाब्यातील सुरूची यासारख्या इमारतींचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -