घरमुंबईया प्रेमवेड्या सीएने सार्वजनिक ठिकाणी लिहिले 'प्रेमसंदेश'

या प्रेमवेड्या सीएने सार्वजनिक ठिकाणी लिहिले ‘प्रेमसंदेश’

Subscribe

प्रेमवेड्या व्यक्तींने सार्वजनिक ठिकाणी प्रेमसंदेश लिहिल्याची घटना चेंबूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी सीए के. के. शहा याला अटक केली आहे.

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार मुंबईतील चेंबूर या ठिकाणी समोर आला आहे. एका प्रेमवेड्या सीएने महिलेसाठी भिंतीवर, रस्त्यांवरील फलकांवर, इमारतीच्या फलकांवर प्रेमसंदेश लिहीले आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रेमसंदेश लिहिल्याप्रकरणी के. के. शहा (५०) याला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रेमसंदेशांचा त्रास होत असल्याची तक्रार संबंधित महिलेने डिसेंबरमध्ये केली होती.

असे व्यक्त केले प्रेम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के. के. शहा या प्रेमवेड्यांने आपले प्रेम एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहा सार्वजनिक भिंतीवर प्रेमसंदेश लिहित होता. या प्रेमसंदेशांकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. पण एक दिवस एक महिला चेंबूर पोलीस ठाण्यात धडकली आणि तिने प्रेमवेडा सीए के. के. शहा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ती जिथे जायची तिथे तिला ते संदेश दिसायचे. यापैकी काही संदेशांमध्ये तिचं नावही लिहिण्यात आलं होतं. तरी देखील तिने याकडे दुर्लक्ष केलं.

- Advertisement -

मात्र, एक दिवस शहा यांनी महिला राहत असलेल्या इमारतीच्या भिंतीवर प्रेमसंदेश लिहिलेले तिला आढळले. त्यानंतर मात्र या महिलेने पोलीस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रेमसंदेशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जागोजागचे सीसीटीव्ही फुटेज चाचपले. यातून त्यांना शहाच्या गाडीचा नंबर कळला आणि तो प्रेमसंदेश लिहित असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी के. के. शहा याच्याविरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


वाचा – अजब प्रेम; प्रियकराला पायलट बनवायला १ कोटी चोरले

- Advertisement -

वाचा – असेही अजब प्रेम!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -