घरट्रेंडिंगमुलगी शोधते ५० वर्षांच्या आईसाठी नवरा; सोशल मीडियावर कौतुक

मुलगी शोधते ५० वर्षांच्या आईसाठी नवरा; सोशल मीडियावर कौतुक

Subscribe

एक मुलगी तिच्या ५० वर्षांच्या आईसाठी नवरा शोधत आहे.

आपण अनेकदा पाहतो, मुलीचे २३ ते २५ वर्ष झाले की, घरची मंडळी मुलीला लग्न कर म्हणून सतत तगादा लावत असतात. मुलीसाठी चांगल स्थळ मिळाव याकरता सतत धडपड करत असतात. मात्र, सध्याच्या बदलेल्या परिस्थीतीनुसार या भूमिका देखील बदलेल्या दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोची कॅप्शन वाचून अनेकांच्या भुवया देखील उंचावतील. या फोटोमध्ये एक तरुणी तिच्या ५० वर्षाच्या आईकरता नवरा शोधत आहे. आस्था वर्मा असे या मुलीचे नाव आहे. ट्विटरवरील प्रोफाइलनुसार; आस्था एक लॉ स्टुडंट आहे. आस्थाचे हे पाऊल अनेकांना पसंत देखील पडले असून तिचे सोशल मीडियावर भरभरुन कौतुक देखील केले जात आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

आस्था वर्मा नावाच्या एका ट्विटर युजर्सला तिच्या आईसाठी एक ५० वर्षीय सुंदर पती हवा आहे. सता आस्थाने फोटो शेअर करत लिहीले आहे की, ‘होणारा पती हा शाकाहारी असावा आणि मद्यसेवन करणारा नसावा’,असे देखील तिने फोटोखाली लिहीले आहे. आस्थाच्या या निर्णयावरुन तिचे सोशल मीडियावर भरभरुन कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी तर मुलाकडची स्थळेही सुचवली आहेत. आस्थाने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी हे ट्विट केले होते. त्यानंतर आतापर्यंत याला २९ हजार ८४४ लाइक्स मिळाले आहेत. तर ६ हजार लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी आस्थाला मॅट्रिमोनिअल साइटवर जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर आस्थाने उत्तर दिले की, तिने सगळीकडे शोधले पण चांगला मुलगा मिळाला नाही.


हेही वाचा – हातात साप घेऊन मोदींना धमकावणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा नग्न व्हिडिओ लिक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -