घरमुंबईमहारक्तदान शिबिरात ५१५ बाटल्या रक्त संकलित

महारक्तदान शिबिरात ५१५ बाटल्या रक्त संकलित

Subscribe

बदलापूरमध्ये संकल्प सेवा समिती आणि काका गोळे फाउंडेशन यांच्या वतीने महारक्तदान करण्याचा “संकल्प” करण्यात आला होता. त्यासाठी ५०० बाटल्या रक्त संकलित करण्याचे त्यांचे लक्ष होते. मात्र त्याहून अधिक बाटल्या रक्त संकलित करत महारक्तदानाची शानदार संकल्पपूर्ती करण्यात आली. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिराचे यंदाचे हे सोळावे वर्ष होते. थॅलेसेमिया बाधित मुलांसाठी रक्ताची प्रचंड आवश्यकता असून त्यासाठी ही रक्तदान चळवळ अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी यंदा महारक्तदानाचा संकल्प करण्यात आला होता. त्यासाठी ५०० बाटल्या रक्त संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

त्या अनुषंगाने या शिबिराची पूर्व तयारी म्हणून ज्या युवक, युवती, महिला आणि पुरुष यांना रक्तदान करायचे अशा सर्वांसाठी एक महिना आधीपासूनच मोफत हिमोग्लोबिन तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात होती. रक्तदाते आणि कार्यकर्ते यांच्या उत्साहामुळे तसेच मेहनतीमुळे ५१५ बाटल्या रक्त संकलित होऊन महारक्तदानाची संकल्पपूर्ती झाली. सुमारे १४० रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्तदाब, आजार यामुळे दुर्दैवाने रक्तदान करता आले नाही. या शिबीराने थॅलेसेमियाग्रस्त ३० मुलांचा पुढील ४ महिन्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच बदलापूरकरांना पुढील १ वर्ष रक्ताचा तुडवडा पडणार नाही, याची तजवीज झाली. या रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे, रोटरी ठाणे गव्हर्नर अशेस गांगुली, भाजप बदलापूर शहराध्यक्ष संभाजी शिंदे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, आगरी युवक संघटनेचे शरद म्हात्रे, डॉ. कैलास पवार, नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल महानगर रक्तपेढी तसेच थॅलेसेमिया बाधित मुलांसाठी काम करणार्‍या समर्पण या रक्तपेढ्यांनी महारक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -