घरमुंबईजानेवारी ते १५ मार्चपर्यंत ५२ रुग्णांना जीवदान

जानेवारी ते १५ मार्चपर्यंत ५२ रुग्णांना जीवदान

Subscribe

१ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत २९ रुग्ण ब्रेनडेड झाले होते. त्यापैकी २७ जणांच्या कुटुंबाने अवयवदानाला परवानगी केली.

थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा प्रत्यय सध्या अवयवदान चळवळीतून येत आहे. मुंबईत या आठवड्यात तीन जणांच्या अवयवदानामुळे दहा जणांना अवयव प्राप्त झाले आहेत. मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समिती (झेडटीसीसी) द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात मेंदू मृत झालेल्या तीन रुग्णांचे अवयव दान करण्यात आले आहे. तर, १ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत २९ रुग्ण ब्रेनडेड झाले होते. त्यापैकी २७ जणांच्या कुटुंबाने अवयवदानाला परवानगी केली. तर, २१ रुग्णांचे अवयव प्रत्यारोपित करण्यात आले. त्यामुळे, ५३ गरजूंना नव्याने जीवनदान मिळालं आहे.

अवयवाच्या प्रतिक्षेच असणाऱ्यांना नवजीवन

अवयवदानाबाबत हळूहळू जनजागृती वाढताना पाहायला मिळत आहे. काही ब्रेनडेड रुग्णांचे नातेवाईक समुपदेशनानंतर अवयवदानाला परवानगी देत आहेत. तर, काही कुटुंब अवयवदानासाठी स्वत:हून पुढाकार घेत आहेत. या निर्णयामुळे कित्येक वर्ष अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजूंना नवजीवन मिळत आहे.

- Advertisement -

तीन जणांनी केले अवयव दान

पहिलं अवयवदान १२ मार्चला मुंबईतील नानावटी रुग्णालयात करण्यात आलं. २६ वर्षीय व्यक्तीचे यकृत, फुफ्फुस आणि मूत्रपिंड हे अवयव दान करण्यात आले. दुसरं अवयवदान अपोलो रुग्णालयात १४ मार्च या दिवशी झालं. ६२ वर्षीय विदेशी व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीनुसार मूत्रपिंड दान करण्यात आलं. तर, तिसरं अवयवदान मुलुंड फोर्टिस रुग्णालयात झालं. ६३ वर्षीय व्यक्तीचं यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया दान करण्यात आलं आहे.

५३ गरजूंवर अवयव प्रत्यारोपण 

याविषयी मुंबई झेडटीसीसीच्या समन्वयक संगीता देसाई यांनी सांगितलं की, ‘‘मुंबईत सरकारी आणि खासगी रुग्णालयात २९ ब्रेनडेड रुग्ण आढळून आले. यातील २७ रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास परवानगी दिली. यातील चौघांचे अवयव काही कारणामुळे प्रत्यारोपित करता आले नाही. तर, दोघांचा हृदय विकारानं मृत्यू झाला. त्यामुळे, २१ जणांचे अवयवदान करण्यात आले. या अवयवदानामुळे ५३ गरजूंवर अवयव प्रत्यारोपित झालेत.”

- Advertisement -

मुंबईतील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण

२९ मूत्रपिंड,१८ यकृत,६ हृदय, ४ फुफ्फुस दान
एक हृदय फोर्टिस रुग्णालयात पाठवण्यात आले.
यकृत पुण्यातील एका रुग्णालयात दान करण्यात आले.
एक फुफ्फुस चेन्नईतील अपोलो रुग्णालयात पाठवले
२ फुफ्फुस चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात पाठवले
एक हृदय नागूपरहून मुंबईत आणण्यात आले

तर, आतापर्यंत मुंबईत जानेवारीपासून ते मार्चच्या पंधरावड्यापर्यंत एकूण २५ अवयवदान झाली आहेत. हे प्रमाण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचं झेडटीसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -