Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई बर्ड फ्ल्यूमुळे मुंबईत 'इतके' कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी 

बर्ड फ्ल्यूमुळे मुंबईत ‘इतके’ कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी 

पालिका आपत्कालीन कक्षातील '१९१६' हेल्पलाईनवर या तक्रारी आल्या आहेत.  

Related Story

- Advertisement -

देशात आणि राज्यात सध्या बर्ड फ्ल्यूबाबत बरीच चर्चा होत आहे. आता मुंबईकर नागरिकही जागरूक झाले असून ५ जानेवारी ते १४ जानेवारी सकाळपर्यंत कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी पालिका आपत्कालीन कक्षातील १९१६ या हेल्पलाईनवर आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात मालाड, बोरिवली, कांदिवली, दादर, परळ, वडाळा, अंधेरी, सायन, माटुंगा, चेंबूर , गिरगाव, कुलाबा आदी भागात बर्ड फ्ल्यूमुळे कावळे, कबुतरे व दोन ठिकाणी चिमण्या मृत पावल्याबाबतच्या तक्रारी या हेल्पलाईनवर येत आहेत. गेल्या ५ जानेवारीपासून मुंबईत पक्षी मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी आल्या आहेत.

देशात व राज्यातील काही जिल्ह्यात दाखल झालेल्या बर्ड फ्ल्यूने मुंबई गाठल्यावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यंत्रणा सतर्क झाली. पालिकेने दोन दिवसांपूर्वी बर्ड फ्ल्यूबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मुंबईत कुठेही मृत कोंबड्या, कावळे, पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी, कोंबडी विक्रेते यांनी घाबरून न जाता तात्काळ मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या ‘१९१६’ या हेल्पलाईनवर संपर्क साधून कळवावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला आहे. ५ जानेवारी ते १४ जानेवारी सकाळपर्यंत कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी पालिका आपत्कालीन कक्षातील १९१६ या हेल्पलाईनवर आल्या आहेत.

- Advertisement -