Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE मुंबईत २४ तासांत ५९२ नवे रुग्ण; ६९५ जण कोरोनामुक्त

मुंबईत २४ तासांत ५९२ नवे रुग्ण; ६९५ जण कोरोनामुक्त

आतापर्यंत एकूण २ लाख ७४ हजार ७६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत शहर व उपनगरातून ५९२ जणांना कोरोनाची लागण झाली. तर विविध रुग्णालयांत उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या ६९५ इतकी होती. गेल्या २४ तासात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात ६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यापैकी पाच रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर दोन जण ४० ते ६० या वयोगटातील होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २३ लाख ८२ हजार ४२० जणांच्या कोरोनासंबंधित चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ९४ हजार ६५९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली असून २ लाख ७४ हजार ७६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या विविध रुग्णालयांत ७ हजार ८९२ रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

मुंबईत अद्यापही काही विभागात कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. काही झोपडपट्ट्या, सोसायटी, इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने शहर व उपनगरातील तब्बल २ हजार ४६२ इमारती या सील करण्यात आल्या आहेत. ३८३ झोपडपट्ट्या व चाळी या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -