घरमुंबई'अस्वच्छ' मंत्रालय; निघाला ६५० ट्रक कचरा

‘अस्वच्छ’ मंत्रालय; निघाला ६५० ट्रक कचरा

Subscribe

मंत्रालात इतक्या मोठ्या प्रमाणात आढळलेला कचरा वाहून नेण्यासाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा खर्च आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनांचे नूततीकरण सुरु आहे. नूतनीकरणाचे काम सुरु असताना या दालनांमधून ६५० ट्रक कचरा निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सूचनेमुळे विधान परिषदेमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केली. ऑक्टोबर २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले. त्यानंतर फडणवीसांच्या मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण करण्यात आले. फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ या काळात मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे काम सुरु असताना संबंधित दालनामधून तब्बल ६५० ट्रर कचरा बाहेर निघाला. इतक्या मोठ्या प्रमाणात आढळलेला कचरा वाहून नेण्यासाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा खर्च आल्याचा आरोप, गाडगीळ यांनी केला.

दरम्यान याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारही करण्यात आली होती. तक्रार नोंदवून घेतल्यानंतक या प्रकरणाच्या चौकशीचे गोपनीय आदेश निघाले पण त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी कोणावरही अद्याप कारवाई झाली नसल्याचेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात इतके टन कचरा निघाला ही खरंच निंदास्पद आणि लज्जास्पद बाब असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी नाशिकच्या मुख्य अभियंत्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका महिन्यामध्ये याविषयीचा सविस्तर अहवाल सादर केला जाईल. दरम्यान, याप्रकरणात जे कुणी दोषी आढळतील यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोटे यांनी सांगितले.


वाचा: मुंबई – दुबईला जोडणार ‘अंडर वॉटर’ रेल्वे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -