घरताज्या घडामोडीकांदिवली, बोरीवली, दहिसरमध्ये ६६ टक्के रुग्ण आढळले इमारतीत

कांदिवली, बोरीवली, दहिसरमध्ये ६६ टक्के रुग्ण आढळले इमारतीत

Subscribe

कांदिवली, बोरीवली, दहिसरमध्ये ६६ टक्के कोरोना रुग्ण हे इमारतीत आढळून आल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरेानाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरी उत्तर मुंबईत मात्र, कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच जात आहे. उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरीवली, दहिसर या तिन्ही प्रभागांमध्ये एकूण रुग्णांची संख्या आता ८ हजार ६७० वर पोहोचली आहे. यातील ४ हजार ६०९ रुग्ण बरे झाले असून सध्या ३ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. मात्र, या तिन्ही प्रभागांमध्ये ६६ टक्के रुग्ण हे इमारतींमधील असून ३३ टक्के रुग्ण हे झोपडपट्टी परिसरांमध्ये आढळून आले आहेत. आतापर्यंत या तिन्ही प्रभागांमध्ये एकूण ४२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरीवली आणि दहिसर या तिन्ही विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये झोपडपट्टींची संख्या मोठया प्रमाणात आहे. सुरुवातीला काही झोपडपट्टयांमधून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी सध्या काही प्रमाणात झोपडपट्टीतील संख्या नियंत्रणात येत आहे. परंतु इमारतींमधील संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. कांदिवलीमध्ये इमारतींमधील रुग्णांची टक्केवारी ६० टक्के, बोरीवलीत ८० टक्के आणि दहिसरमध्ये हे प्रमाण ७० टक्के याप्रकारे एकूण सरासरी ६६ टक्के एवढी असल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होते. तर झोपडपट्टींमध्ये रुग्ण आढळून येण्याची टक्केवारी ही कांदिवलीत ४१ टक्के, बोरीवलीत १९ टक्के आणि दहिसरमध्ये हे प्रमाण २५ ते ३० टक्के एवढे आहे.

- Advertisement -

७४ हजार लोकांना ठेवले संस्थात्मक विलगीकरणात

कांदिवली, बोरीवली आणि दहिसर या तिन्ही विभागांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यापासून आतापर्यंत अतिनिकटच्या संपर्कातील एकूण ७४ हजार ६७४ लोकांना संस्थात्मक विलगीकरणात अर्थात क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये बोरीवलीमध्ये ३२ हजार लोकांना क्वारंटाईन केले. तर त्याखालोखाल दहिसरमध्ये २२ हजार ५६६ लोकांना आणि कांदिवलीत २० हजार ३० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. तर रुग्णाशी दूरचा संबंध असलेल्या एकूण १ लाख ५३ हजार ३७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये दहिसरमध्ये सर्वाधिक ७२ हजार ३८२ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर त्याखालोखाल बोरीवलीत ४९ हजार ४३९ लोकांना आणि कांदिवलीत ३१ हजार २१६ होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आर-दक्षिण (कांदिवली) :

- Advertisement -

एकूण रुग्ण : ३३६१ (मृत्यू : १५८)

  • झोपडपट्टीतील रुग्ण : १३९१
  • इमारतींमधील रुग्ण : १९७०
  • डिस्चार्ज झालेले रुग्ण : १८३८
  • उपचार सुरु असलेले रुग्ण : १३६५
  • अतिनिकटच्या संपर्कातील संशयित रुग्ण :२० हजार ३०

आर-मध्य (बोरीवली) :

  • एकूण रुग्ण : ३३३८ (मृत्यू : ११२)
  • झोपडपट्टीतील रुग्ण : ६६५
  • इमारतींमधील रुग्ण : २६७३
  • डिस्चार्ज झालेले रुग्ण : १५८०
  • उपचार सुरु असलेले रुग्ण : १६४६
  • अतिनिकटच्या संपर्कातील संशयित रुग्ण : ३२ हजार ७९

आर-उत्तर (दहिसर) :

एकूण रुग्ण : १९७१ (मृत्यू : १५८)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -