घरमुंबईमुंबईतील ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईतील ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

काही अधिकाऱ्याचा कार्यकाळ संपलेला नसताना त्यांची करण्यात आलेल्या बदल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कऱण्यात आलेल्या आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांचा जुन्या ठिकाणचा कार्यकाळ अद्याप संपलेला नसताना देखील करण्यात आलेल्या बदल्यामुळे काही जणांमध्ये नाराजीचे सूर आहेत. राज्याच्या गृह विभागाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना मुंबईतील मध्य प्रादेशिक विभागातुन उचलून संरक्षण व सुरक्षा विभाग या ठिकाणी टाकण्यात आली असून संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त निशीत मिश्रा यांची बदली दक्षिण प्रादेशिक विभागात करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त एस. विरेश प्रभू यांना मद्य प्रादेशिक विभाग या ठिकाणी बदली देण्यात आली असून त्यांच्या जागी दक्षिण प्रादेशिक विभागाचे प्रवीण पडवळ यांची बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

दरम्यान, प्रशिक्षण प्रतिनियुक्तीवरून परत हजर झालेले अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांची बदली विशेष कृती दल महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय येथे करण्यात आली आहे. एस जगन्नाथन प्रशिक्षण प्रतिनियुक्तीवरून परत हजर झाला असून त्यांची बदली अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन व समनव्यय ) म्हणून राज्य पोलीस मुख्यालय येथे बदली कऱण्यात आली आहे. अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन व समनव्यय ) धनंजय कमलाकर यांची बदली (धोरण) महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय येथे बदली करण्यात आलेली आहे. यातीळ काही अधिकाऱ्याचा कार्यकाळ संपलेला नसताना त्यांची करण्यात आलेल्या बदल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहे.

मुंबई पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना कार्यकाळ वाढवून देण्यास नोडणूक आयोगाने नकार दिला असून राज्य शासनाने त्यांना भारती याचा सध्याचा पदाचा कार्यकाळ वाढवून देण्यासाठी निडणूक आयोगाकडे लेखी कळवले आहे.

- Advertisement -

देवेन भारतींची बदली नाही

देवेन भारती हे १९९४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. १५ एप्रिल २०१५ रोजी त्यांची मुंबइचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती कऱण्यात आली असून त्यांना या पदावर ४ वर्षे पूर्ण होऊनही त्याची बदलीचे कुठलेही आदेश अद्याप आलेले नसल्यामुळे त्यांच्यावर सरकार मेहरबान असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -