Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत मृत कावळे, कबुतरांबाबत एकाच दिवसात तब्बल ७० तक्रारी

मुंबईत मृत कावळे, कबुतरांबाबत एकाच दिवसात तब्बल ७० तक्रारी

९५ टक्के तक्रारी या कावळे मृत पावल्याबाबतच्या

Related Story

- Advertisement -

मुंबईत चेंबूर, गिरगाव भागात बर्ड फ्ल्यूमुळे कावळे मृत पावल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यासाठी पालिकेने तयार केलेल्या हेल्पलाईनवर मृत कावळे, कबुतरांच्या तब्बल ७० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतही बर्ड फ्ल्यूबाबत अधिक काळजी घेण्याची गरज भासू लागली आहे.यासाठी पालिकेने मुंबईत कुठेही कावळे, पक्षी, प्राणी मृत पावल्याचे आढळून आल्यास पालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन केले होते. त्यावर पुढील २४ तासात मुंबईतील कुलाबा, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, दादर, प्रभादेवी, वडाळा,माटुंगा, सायन, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरात कावळे, कबुतरे मृत पावल्याबाबत पालिकेच्या ‘१९१६’ या हेल्पलाईनवर तब्बल ७० तक्रारी दाखल झाल्या आहेत.

यामध्ये, ९५ टक्के तक्रारी या कावळे मृत पावल्याबाबतच्या आहेत. तर ४-५ तक्रारी या कबुतरे मृत पावल्याबाबत आहेत.
या तक्रारींनंतर पालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन मृत कावळे, कबुतरे ताब्यात घेत. पुढे त्या मृत पक्षांची तपासणी करत विल्हेवाट लावत आहेत. वास्तविक, पालिकेकडे ५ जानेवारीपासूनच चेंबूर,गिरगाव आदी भागात कावळे मृत पावल्याबाबतच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या.मात्र कावळे, कबुतरे मृत पावल्याबाबतच्या तक्रारी पाहता पालिका आरोग्य यंत्रणेला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -