पश्चिम रेल्वे स्थानकावर दोन वर्षांत ७४ पादचारी पूल बांधणार

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या आणि या मार्गावरील व्यवसायिक केंद्रांची भरभराट झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रस्तावित पूलपैकी ७५ टक्के उपनगरीय नेटवर्कवर योजना आखली आहे.

Mumbai
railway station bridge
पादचारी पूल

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गेल्यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे रेल्वेवरील अपुऱ्या आणि अरुंद पुलांचा प्रश्न अधोरेखित झाला होता. या घटनेला लक्षात घेता पश्चिम रेल्वेने पुढील दोन वर्षात पश्चिम रेल्वे मार्गावरल ७४ नवीन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढची संख्या आणि या मार्गावरील व्यवसायिक केंद्रांची भरभराट झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रस्तावित पूलपैकी ७५ टक्के उपनगरीय नेटवर्कवर योजना आखली आहे.

चांगल्या सोयी-सुविधा दिल्या

पश्चिम रेल्वेने यावर्षी १३ पादचारी पूल बांधले आहेत. तर ३४ पादचारी पुलांचे काम सुरु असून पुढच्या वर्षी जूनपर्यंत काम पूर्ण होईल. तर उर्वरीत बांधकाम २०२० पर्यंत पूर्ण होईल असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी- सुविधांमुळे पश्चिम रेल्वे वारंवार टीकेचे केंद्रस्थान बनले आहे. हे सर्व लक्षात घेता पश्चिम रेल्वेने प्रवाशांना चांगली सोयी-सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर पादचारी पुल, स्वयंचलीत जीने आणि लिफ्टच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या.

या स्थानकावरील पुलाचे काम पूर्ण

दरम्यान, नवीन बदलाप्रमाणे काही पादचारी पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रभादेवी, सांताक्रुझ, लोअर परेल, बोरीवली, विरार, माटुंगा रोड, जोगेश्वरी, गोरेगाव, खार रोड आणि जोगेश्वरी या रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आम्ही पश्चिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुधारीत सोयी -सुविधा मिळाव्यात याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. शहरातील उपनगरीय स्थानक आमचे प्राधान्य असणार असल्याचे, पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारचा पाठिंबा

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिस्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीनंतर रेल्वे मंत्र्यांनी उपनगरीय नेटवर्कवर चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here