घरCORONA UPDATEचिंता कायम! गेल्या २४ तासात ७७ पोलीस कोरोनाबाधीत!

चिंता कायम! गेल्या २४ तासात ७७ पोलीस कोरोनाबाधीत!

Subscribe

आत्तापर्यंत कोरोनामुळे ५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

देशासह राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाचा सर्वाधिक धोका या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात वाढला आहे. गेल्या २४ तासात ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून दोन पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ३० वर पोहचली आहे. अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

- Advertisement -

या लॉकडाउनच्याकाळात पोलिस आपल्या जीवावर उदार होऊन, कर्तव्य बजवात आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी ते २४ तास ऑनड्यूटी करताना दिसतात. अशावेळी मात्र तेच कोरनाची शिकार होताना दिसत आहेत. आता त्यांना देखील कोरोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे.आत्तापर्यंत कोरोनामुळे ५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होणारी लागण बघता पोलीस गलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर देशात गेल्या २४ तासात सीमा सुरक्षा दलाचे आणखी २१ जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, १८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३०५ जवानांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत एकूण ६५५ जणांना कोरोनावर मात केली असल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान, ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. दरम्यान, ३० जून रोजी लॉकडाऊन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -