घरताज्या घडामोडीमहासभेत केडीएमसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

महासभेत केडीएमसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Subscribe

महासभेच्या मंजुरीनंतर कर्मचार्यांनी पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार वेतन श्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या सर्व साधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा वेतन आयोग, महापालिकेतील ६ हजार ५४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आला असून महासभेच्या मंजुरीनंतर कर्मचार्यांनी पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

१ जानेवारी २०१६ पासूनचा सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना आता लागू होणार आहे. मात्र महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाची रक्कम देण्यात आलेली नाही. सातवा वेतन आयोगासाठी सुधारीत अर्थसंकल्पात १० कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतू हा वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याने, गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी संघटनेकडून अनेकवेळा आंदोलन करण्यात आली होती. मात्र यावेळेस मंगळवारच्या महासभेत सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली. महासभेच्या मंजुरी नंतर कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या आवारात फटाके वाजवून व ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

सातवा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी सुधारीत केल्यास मासिक ४.७५ कोटी व १ जानेवारी २०१६ वार्षिक ५७ कोटी असा वाढीव खर्च अपेक्षित आहे. सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासूनचा लागू होणार असल्याने ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम ११५.५६ कोटी आहे. थकबाकीची रक्कम ५ वर्षात ५ समान हप्त्यात भविष्य निर्वाह खात्यात जमा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -