घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत २४ तासांत ८०६ रुग्णांची वाढ, एकूण आकडा ८६ हजार...

Corona Update: मुंबईत २४ तासांत ८०६ रुग्णांची वाढ, एकूण आकडा ८६ हजार पार!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ८०६ नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८६ हजार १३२वर पोहोचला असून मृतांचा ४ हजार ९९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ९८५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६८ हजार १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज ९३३ संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत मुंबईत भरती झालेल्या संशयीत रुग्णाचा आकडा ६० हजार ११४ झाला आहे. तसेच सध्या २२ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामधील ५४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४४ रुग्ण पुरुष आणि २० महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ४० जणांचे वय ६० वर्षा वर होत, तर उर्वरित १९ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईत रिकव्हर होण्याचा रेट हा ६७ टक्के एवढा आहे. तसेच ६ जुलैपर्यंत ३ लाख ६३ हजार १२० कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर हा ४४ दिवस आहे.

- Advertisement -

आज दिलासा देणारी बाब म्हणजे धारावीत एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३३५वर पोहोचला असून यापैकी ३५२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे आणि १ हजार ७३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत कोरोनाचे २२४ बळी, एकूण मृतांचा आकडा ९२५०वर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -