घरमुंबईरिक्षाचालकांचं आयुष्य धोक्यात; ८५ टक्के चालकांना तंबाखूचं व्यसन

रिक्षाचालकांचं आयुष्य धोक्यात; ८५ टक्के चालकांना तंबाखूचं व्यसन

Subscribe

रिक्षाचालकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

रिक्षाचालकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. “कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन (सीपीएए) ने केलेल्या सर्वसमावेशक सर्वेक्षणांमध्ये तब्बल तीन हजार रिक्षा चालकांची तपासणी केली गेली. त्याशिवाय गेल्या पाच महिन्यांमध्ये मुंबईत घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरादरम्यान तब्बल ८५ टक्के चालक हे तंबाखूच्या अधिन गेल्याचं समोर आलं आहे. तर, ४५ टक्के चालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे आढळली आहेत. या सर्वेक्षणात प्लाकिया, सब म्युकस फायब्रॉसीस, बायोप्सी, एफएनएसी या रोगांचा समावेश असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढला गेला. मुंबईतील कुर्ला, सांताक्रूझ, बोरीवली, गोरेगाव आणि मालाड या उपनगरांचा या सर्वेमध्ये समावेश होता. ज्यात तंबाखूचं व्यसन लागण्याचं कारण, निदान, उपचार असा हा सर्वेक्षण केला गेला.

या कारणांमुळे लागते तंबाखूचं व्यसन

रिक्षा चालकांमध्ये तंबाखूचं व्यसन अनेक कारणांमुळे लागू शकते. व्यावसायिक ताणतणाव, भूक मारणं, तेच काम करणं, प्रदूषणाचा त्रास आणि आपल्या कुटुंबापासून आलेला दुरावा या कारणांमुळे तंबाखू सेवनाची सवय मोठ्या प्रमाणावर आढळून येते. रिक्षाचालक हे नियमितपणे तणावाखाली असतात. विविध सर्वेक्षणांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे की सर्वसाधारण लोकांपेक्षा त्यांच्यामधील तणावाची पातळी ही नेहमीच अधिक असते.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना सीपीएएच्या कार्यकारी संचालिका श्रीमती अनिता पीटर यांनी सांगितलं की, “रिक्षाचालकांमध्ये तणावाचे प्रमाण खूप मोठे असते आणि त्यामुळेच त्यांना तंबाखू सेवनाची सवय लागते. ती सुटावी यासाठी सीपीएएने अनेक वर्ष सर्वे करुन जनजागृती करत आहे. ज्या रिक्षाचालकांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळली त्यांना तपासणीचाही सल्ला दिला गेला.”

मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं की, “रिक्षाचालकांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक असते आणि त्यांना प्रदूषणाचाही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. ते आपल्या कुटुंबापासून खूप काळ दुरावलेलेही असतात आणि त्याचमुळे त्यांना तंबाखू सेवनासारखी सवय लागते. ‘तंबाखू रहित ऑटोरिक्षा’ ही प्रसारमोहीम यशस्वी व्हावी हे माझे मिशन आहे.”

- Advertisement -

तर, स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनचे अध्यक्ष के.के.तिवारी यांनी सांगितलं की, “दोन वर्षांपूर्वी तंबाखूविरोधी आम्ही देखील राबवली होती. याचा खूप फायदा झाला. फक्त तंबाखूचंच नाहीतर गुटख्याचं देखील सेवन केलं जातं. जवळपास १५ टक्के रिक्षावाले या मोहिमेत व्यसन केल्याचं समोर आलं आहे. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -